कोल्हापुरात काल परतीचा पाऊसाने धुमाकूळ घातलाप्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुरात काल परतीचा पाऊसाने धुमाकूळ घातला , अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली

अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, फांद्या मोडल्या

कोल्हापूरमध्ये झालेल्या वादळी पावसाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. उजळाईवाडी ते शाहू जकात नाका ते टेंबलाई उड्डाण पूल मार्गावर जोरदार वार्‍याने अनेक झाडांच्या फांद्या मोडून पडल्या. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. शिवाजी विद्यापीठ परिसरातही झाडे वाऱ्याने मोडली गेली. शहरातील शाहू मिल चौकातही झाड कोसळल्याची घटना घडली.

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर महाकाय झाड कोसळले

कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील दोनवडेत झाड कोसळल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे कोकणात जाणारी वाहतूक खोळंबली. या महाकाय झाड कोसळल्याने कोणतीही सुदैवाने जिवितहानी झाली नाही. हे वडाचे सव्वाशे वर्षांचे असल्याचे बोलले जाते. दरम्यान, पर्यायी मार्ग म्हणून साबळेवाडी-खुपिरे-दोनवडे-वाकरे मार्गे वाहतूक सुरु आहे

Post a Comment

Previous Post Next Post