मोठी बातमी : आमदार बच्चू कडू यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली



प्रेस मीडिया लाईव्ह :

 मुंबई : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू यांना गिरगाव न्यायालयाने  १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.२०१८ मध्ये एका आंदोलना दरम्यान सरकारी कामांत अडथळा आणल्या प्रकरणी गिरगाव न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यानंतर ते आज न्यायालयात हजर झाले होते.

याप्रकरणी आज सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने बच्चू कडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण. ?

आमदार बच्चू कडू हे एम.पी.एस.सी , परीक्षा घेण्यात येणाऱ्या महापोर्टल बंद करण्यासाठी तत्कालीन , पी, प्रदीप .महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान संचालक यांची 26 सप्टेंबर 2018 रोजी मंत्रालय येथे भेट घेतली होती. यावेळी पी प्रदीप आणि आमदार बच्चू कडू यांच्यत वाद झाला होता. तेव्हा , बच्चू कडू यांनी टेबलावरील लॅपटॉप पी प्रदीप यांच्यावर उगारला होता , त्यामुळे मंत्रालय कर्मचारी यांनी उग्र आंदोलन केले होते. तर याप्रकरणी प्रदीप यांनी बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

Post a Comment

Previous Post Next Post