नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीबाबत माहिती देण्याचे आवाहन


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक  नुकसानीच्या कठीण परिस्थितीत पीक विमाधारक शेतकऱ्यांना फायदा होण्याच्यादृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत ७२ तासांच्या आत माहिती द्यावी आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी केले आहे.

सप्टेंबर २०२२ मध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसानीसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत विमा संरक्षण दिले जाते.

प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत खरीप हंगाम २०२२-२३ मध्ये जिल्हयातून एकूण ९ हजार ६४३ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. विमाधारक बाधीत शेतकऱ्यांनी आपले नुकसानीची पूर्वसुचना विमा कंपनीस ७२ तासांचे आत सादर करणे बंधनकारक आहे.

नुकसानीबाबत माहिती देण्यासाठी क्रॉप इन्सुरन्स अॅपद्वारे,  संबंधीत विमा कंपनीच्या १८००२६६०७०० या टोल फ्री क्रमांकावर तसेच  बँक, वित्तीय संस्था, कृषी व महसुल विभाग यांच्याकडे पीक विमाधारक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती वेळेत द्यावी, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post