विशेष बातमी : मोबाईल रिचार्जची वैधता 28 नव्हे 30 दिवस

प्रेस मीडिया लाईव्ह :

गणेश राऊळ :

मोबाईल रिचार्जची वैधता (Recharge Validity) दोन दिवसांनी वाढवण्याचे निर्देश ट्रायने सर्व मोबाईल नेटवर्क सेवा पुरवठादार कंपन्यांना दिले आहेत.

28 नव्हे 30 दिवसांचा रिचार्ज

ट्रायने मोबाईल कंपन्यांना रिचार्ज कालावधी वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, दोन दिवसांनी हा कालावधी वाढवण्यास सांगण्यात आले आहे. आता 28 नव्हे 30 दिवसांचा रिचार्ज करण्याचे निर्देश मोबाईल कंपन्यांना दिले आहेत.

दुसऱ्यांदा निर्देश

TRAI ने मोबाईल रिचार्ज वैधतेविषयी यापूर्वीही निर्देश दिले होते. परंतु, टेलिकॉम कंपन्यांनी त्याचे पालन केले नाही. त्यामुळे ट्रायने पुन्हा निर्देश दिले आहेत.

28 दिवसांची वैधता

सध्या टेलिकॉम कंपन्यांना ग्राहकांना सध्या जो रिचार्ज प्लॅन देत आहेत. तो 28 दिवसांच्या वैधतेचा आहे. तो संपूर्ण महिन्यांचा म्हणजे 30 दिवसांचा नाही.

काय होतो तोटा

सध्याच्या प्लॅनवर 28 दिवसांची वैधता मिळते. त्या हिशोबाने 12 महिन्यांसाठी ग्राहकांना 13 वेळा रिचार्ज मारावा लागतो. म्हणजे एका महिन्याची रक्कम नाहक रिचार्जसाठी खर्च करावी लागते.

एक रिचार्ज वाचेल

ट्रायच्या या निर्देशांची अंमलबजावणी झाल्यास प्रत्येक ग्राहकांचे वर्षाकाठी एक रिचार्ज वाचेल. त्यामुळे एका महिन्यासाठीचा नाहकचा खर्च वाचेल.

टेलिकॉम कंपन्यांना 60 दिवसांचा कालवधी

TRAI ने या निर्देशांचे पालन करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांना 60 दिवसांचा कालवधी दिला आहे. त्यासाठी ट्रायने अधिसूचनाही काढली आहे.

काय म्हटले आहे ट्रायने

TRAI ने सर्व टेलिकॉम कंपन्यांना मोबाईल रिचार्चसाठी 30 दिवसांची वैधता करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच तात्काळ अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत.

28 दिवसांवरुन अनेक तक्रारी

28 दिवसांच्या वैधतेवरुन देशभरातून ग्राहकांच्या सातत्याने तक्रारी येत होत्या. या तक्रारींची ट्रायने दखल घेतली. कंपन्यांच्या या खेळीमुळे वर्षाकाठी एका महिन्याचा जास्तीचा रिचार्ज करावा लागतो आणि त्याचा भूर्दंड सहन करावा लागतो अशी तक्रार ग्राहकांनी केली होती.

Post a Comment

Previous Post Next Post