पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते यांच्या मागणीला यश

 प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील : 

पनवेल : आरोग्य विभागातील कोविड काळात रुजू केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी पनवेल महानगरपालिका आरोग्य विभागात कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते अजित पवार, आरोग्य मंत्री तानाजी सावंत तसेच पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त ह्यांच्या पत्राद्वारे ९ सप्टेंबर २०२२ रोजी पनवेल पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे केली होती. १२ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत राज्यात आगामी काळात सार्वजनीक आरोग्य विभागात भरण्यात येणाऱ्या ७ हजार पदांसाठी कोविड काळात सेवा दिलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे गुणांकन करून त्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्या मागणीला यश आले आहे.

           देशावर कोरोना ह्या रोगाचे संकट ओढवले होते तेव्हा आरोग्य सेवेत स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या जीवावर बेतून नागरिकांचे प्राण वाचवण्याचे काम आरोग्य सेवकांनी केले आहे. पनवेल महापालिकेचे आताचे ११ आणि नव्याने मंजूर झालेले ९ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. महापालिका क्षेत्राची लोकसंख्या पाहता भविष्यात आणखीन काही आरोग्य केंद्र आणि मिनी हॉस्पिटल उभारावे लागतील. कोविड काळात डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्नीशियन अशा विविध पदावर नेमलेल्या आरोग्य सेवकांना कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आरोग्य सेवा कुमकुवत झाल्याचे जाणवत आहे. कोरोना रोगाचे संकट हे अचानक आले होते. तेव्हा आरोग्य सेवा ही कमकुवत होती त्यामुळे सुरुवातीच्या काळात अनेक नागरिकांना प्राण गमवावे लागले. ज्यावेळी आरोग्य सेवकांची नेमणूक करून आपली आरोग्य सेवा बळकट केली तेव्हा लाखो नागरिकांचे प्राण वाचविण्यात पनवेल महानगरपालिकेला यश आले

             कोरोना सारखे प्राणघातक रोग कधीही उद्भवू शकतात. त्यामुळे आपली आरोग्य सेवा कायम बळकट असणे गरजेचे आहे. पालिकेच्या अर्थव्यवस्थेत कायमस्वरूपी तरतूद ठेऊन पनवेल महानगरपालिकेची आरोग्य सेवा बळकट ठेवण्यासाठी आरोग्य सेवकांना पालिकेत कायम स्वरूपी ठेवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावा.अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यानी केली होती. माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्या मागणीला यश आले आहे.

देशाच्या सीमेवर भारतीय जवान स्वतःच्या जीवाची बाजी लावून लढत असतो. त्याप्रमाणे कोरोना काळात हे आरोग्य सेवक लढत होते. त्यांना त्यांच्या सेवेचे फळ मिळावे याकरिता मी केलेल्या मागणीचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने तातडीने तयार करून आरोग्य सेवकांना नोकरीत कायम करावे. -प्रितम जनार्दन म्हात्रे, मा.विरोधी पक्ष नेता, पनवेल महानगरपालिका

Post a Comment

Previous Post Next Post