सिंधुदुर्ग येथे राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागीय भरारी पथकाची मोठी कारवाई ..

आयशर टेम्पोसह ५५ लाख ४२ हजारांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त केले 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर :  सिंधुदुर्ग येथे राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर  विभागीय भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे.आयशर टेम्पोसह ५५ लाख ४२ हजारांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त केले आहे. कोल्हापूर विभागाने आतापर्यंत केलेल्या कारवाईत ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. या प्रकरणी संशयित आरोपी संजय मारुती गवस (वय ४२) यास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी पहाटे केली आहे.

मा. आयुक्त, कांतीलाल उमापसो यांच्या आदेशानुसार संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उपायुक्त बी.एच.तडवीसो यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर  राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाने ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, ९ सप्टेंबर रोजी बांदा गावच्या हद्दीत गोवा-मुंबई महामार्ग क्र. ६६ येथे पहाटे छापा टाकून अवैद्य मद्याची वाहतूक करत असताना कागदी पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये फक्त गोवा राज्यात विक्रीला असणाऱ्या विदेशी मद्याच्या बाटल्या सापडल्या.

यात ७५० मिलीच्या एकुण १२०० बंद बाटल्या तसेच १८० मिलीच्या एकूण २१९३६ बाटली सापडल्या. या वाहणाच्या चारही बाजूला पिवळ्या रंगाच्या नंबर प्लेट चिकटवला होत्या. कोल्हापूर विभागीय भरारी पथकाची ही सर्वात मोठी कारवाई आहे.सदरची कारवाई निरीक्षक एस. जे. डेरे, दुय्यम निरीक्षक एस. एस. गोंदकर, आर.जी. येवलुजे यांच्यासह कॉन्स्टेबल- सुशांत बनसोडे, विलास पवार,अमोल यादव, दीपक कापसे यांनी केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक श्री एस एस गोंदकर हे करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post