हजारो पुणेकरांच्या उपस्थितीत दगडु शेठ गणपतीची भव्य व दिमाखदार मिरवणूक

दगडु शेठ गणपतीची भव्य व दिमाखदार मिरवणूक  


गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... या निनादाने लक्ष्मी रस्त्याचा परिसर दुमदुमला.

पहाटे सहा वाजताही पुणेकरांचा उत्साह कायम होता.

वाजत गाजत आलेली ही गणरायाची स्वारी पाहण्यासोबतच श्रीं चे दर्शन घेण्याकरिता हजारो गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली.

अनंत चतुर्दशीला 'दगडूशेठ' चे गणपती बाप्पा हजारो मोतिया रंगाच्या व एलईडी दिव्यांनी उजळलेल्या श्री स्वानंदेश रथामध्ये विराजमान होत सांगता मिरवणुकीत सहभागी झाले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३० व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावरून शनिवारी सकाळी थाटात निघाली.

रथावर एलईडी लाईट्सची रोषणाई करण्यात आली होती.

पाणवलेल्या डोळ्यांनी लाडक्या दगडूशेठ बाप्पाला निरोप देण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post