२३ हजाराची लाच मागणारा वरिष्ठ लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यातप्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : सेवानिवृत्त सहायक शिक्षकाची फंडाची रक्कम मिळण्याकरता प्रस्ताव तयार करून कोषागार कार्यालयाकडे पाठविण्यासाठी २३ हजाराची लाच मागणारा वरिष्ठ लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला.उत्तम बळवंत कांबळे (रा. टाकवडे वेस, इचलकरंजी ) असे या लिपिकाचे नाव आहे.

हत्तीमहाल येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, संजीव बंबरगेकर, शरद पोरे, विकास माने, सुनिल घोसाळकर, रुपेश माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

Previous Post Next Post