पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या कामकाजाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला

न्यायालयाच्या निर्णयामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातो.


प्रेस मीडिया लाईव्ह :

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तांतरावरील सर्वोच्च न्यायातील सुनावणी संपली आहे. न्यायालयाने खरी शिवसेना  कुणाची आणि शिवसेनेचा 'धनुष्यबाण' या पक्षचिन्ह कुणाला मिळणार, यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

न्यायालयाच्या निर्णयामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातो. आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती नाही, असेही न्यायालयाने आज (27 सप्टेंबर) पार पडलेल्या सुनावणीत घेतला आहे. न्यायालयात आज (27 सप्टेंबर) पार पडलेल्या सुनावणीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

या प्रकरणावर न्यायमूर्तीं धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमुर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी पार पडणार आहे. यात चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्तीं एम.आर. शहा, न्यायमूर्तीं कृष्ण मुरारी, न्यायमूर्तीं हिमाकोहली आणि न्यायमूर्तीं पी. नरसिंहा यांचा समावेश आहे.




Post a Comment

Previous Post Next Post