उपसरपंच पदी सौ बाळाबाई मंगराया हक्के यांची बिनविरोध निवडप्रेस मीडिया लाईव्ह :

टाकळीवाडी:- नामदेव निर्मळे

  टाकळीवाडी तालुका:- शिरोळ  येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ बाळाबाई मंगराया हक्के यांची 27/09/2022 रोजी बिनविरोध निवड करण्यात आली.

    उपसरपंच पदाच निवडीचे पत्र ग्रामपंचायत सरपंच मंगल बिरणगे, ग्रामसेवक एन.एच.मुल्ला यांच्या हस्ते देण्यात आले.

  सौ बाळाबाई हक्के बोलताना म्हणाले की मला मिळालेल्या संधीचा मी टाकळी वाडी गावासाठी पूर्णपणे उपयोग करीन आणि गावच्या उन्नतीसाठी प्रयत्न करीन मला बिनविरोध उपसरपंच पदी निवड केल्याबद्दल सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, व ग्रामसेवक ,सर्व गावकऱ्यांचे ,सर्व गटनेत्यांचे,  मी आभारी आहे. गावाने मला एक संधी दिली आहे .गावचे हितासाठी मी प्रामाणिकपणे व निस्वार्थपणे काम करेन अशी ग्वाही देतो.

  यावेळी सरपंच, माजी उपसरपंच , ग्रामसेवक, ग्रामपंचायत सर्व सदस्य, गावातील सर्व नागरिक, तसेच महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष माजी सुभेदार केंदबा कांबळे, सैनिक वेल्फेअर असोसिएशनचे टाकळीवाडी चे संस्थापक अध्यक्ष माजी ऑरनरी कॅप्टन रमेश निर्मळे, दादा खोत, संजय बदामे, सर्व ग्रामस्थ उपस्थितीत होते.

Post a Comment

Previous Post Next Post