एटीएम मशीन फोडुन चोरी करण्याचा प्रयत्न करणा-या परराज्यीय टोळीचा पर्दाफाश


प्रेस मीडिया लाईव्ह :

जब्बार मुलाणी : 

कोंढवा, हांडेवाडी, मोहम्मदवाडी भागात मध्यरात्री एटीएम बुथ फोडुन चोरीचा प्रयत्न करणारी टोळी सक्रिय झाली होती. सदर टोळीकडुन बँक ऑफ महाराष्ट्र, फायनान्स बँक आय. सी. आय. सी. आय. पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम मशीन फोडुन त्यातील पैसे चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु बँकेच्या सीसीटिव्हि सर्व्हेलन्स व पोलीसाच्या गस्तीमुळे सदर टोळीचा प्रयत्न पाच ते सहा चोरीचा प्रयत्न फसला होता. त्याबाबत कोंढवा पोलीस ठाणे पुणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले होते. 

सदर टोळी ही पुन्हा गुन्हे करण्याची दाट शक्यता असुन त्याचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानकर यांनी सुचना दिल्या होत्या. सदर आरोपी याचा शोध तपासपथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पो.हवा. हिरवे, पो.शि. चिंचकर, पो.ना. देसाई, पो.शि.रत्नपारखी, पो.शि. रासगे, पो.शि. जडे, पो.ना.राठोड, पो.शि. भोसले, पो.शि. मोरे असे आरोपी यांचा घटनास्थळी भेट देवुन घटनास्थळाच्या आजुबाजुस सीसीटिव्हि फुटेज मध्ये आरोपी दिसतो का ? यादृष्टीने शोध घेत होतो. सदर गुन्हा हा आरोपी १) रोहित रामखिलावन मिश्रा, वय 24 वर्षे, रा. मुळ रा. मझगवा, पो.स्टे. सारसवाडी, जि. उमरिया, सध्या रा. टिळेकरनगर गल्ली नं.03, कोंढवा बु पुणे २) शिवम ओमकार तिवारी, वय १९ वर्षे, रा. हरसम्हार पो स्ट आरिबपुर, हरसम्हार आरिबपुर आंबडेकरनगर टाडा उत्तरप्रदेश व पाहिजे आरोपी ३) शिवम सोनी रा. मुळ रा. उत्तरप्रदेश पंचव्हागाव, ४) वाल्मिकी शुक्ला, रा. उत्तरप्रदेश पंचव्हागाव यांनी केला असल्याचे पोलीस अंमलदार अमोल हिरवे, गणेश चिंचकर व निलेश देसाई यांनी सीसीसटिव्हि फुटेज व तांत्रिक विलेश्षणाच्या आधारे उघड केले असुन आरोपी क्रं.०१ यास एनआयबीएम रोड व आरोपी क्रं.०२ यास सुरज गुजरात येथुन ताब्यात घेवुन अटक करण्यात आली. तसेच गुन्हा करण्यासाठी वापरेलेले ग्रैन्डर, कटावनी, हतोडा, स्कु ड्रायव्हर, गुन्हयात वापरलेली ज्युपीटर मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. आरोपी यांच्याकडे अधिक तपास करता आरोपी याने पुढीलप्रमाणे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.

१) कोंढवा पोलीस ठाणे

दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५, पुणे शहर व सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली करीत आहेत..

सदर कामगिरीबाबत मा. अमिताभ गुप्ता सो. पोलीस आयुक्त, मा.संदिप कर्णिक साो, सह पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांनी कोंढवा पोलीस स्टेशनचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post