शिरोळ येथील श्री दत्त भांडारच्या वतीने भव्य लकी ड्रॉ योजनेचे आयोजन

ग्राहकांनी लाभ घेण्याचे उद्यानपंडित गणपतराव पाटील यांचे आवाहन


प्रेस मीडिया लाईव्ह :

 शिरोळ/प्रतिनिधी:

 शिरोळ येथील श्री दत्त भांडारच्या वतीने गणेशोत्सव, दसरा आणि दीपावली या उत्सव, सणानिमित्त ग्राहकांसाठी भव्य लकी ड्रॉ योजनेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २५ ऑगस्ट २०२२ ते दि. ३१ ऑक्टोबर २०२२ अखेर ३ हजार रुपयांवरील खरेदीवर एक कुपन मिळणार असून या योजनेखाली ५१ बक्षिसे देण्यात येणार आहेत, अशी माहिती श्री दत्त कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या योजनेत ग्राहकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

 या संदर्भात अधिक माहिती देताना श्री दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार म्हणाले, पहिले बक्षीस बेड (संपूर्ण सेट), दुसरे बक्षीस सोपासेट, तिसरे बक्षीस डायनिंग टेबल, यासह ४ ते १४ बक्षिसामध्ये टी.व्ही. शोकेस, लाकडी कपाट, दिवाण सेट, कुलर, ड्रेसिंग टेबल, स्टँड फॅन, लाकडी आराम खुर्ची, टेबल फॅन, पैठणी साडी, शूटिंग शर्टिंग, हॉट पॉट अशी इतर बक्षीस आहेत. याचबरोबर गतवर्षी सुरू केलेली ग्राहक संरक्षण विमा योजना ही १३० ग्राहकांना पॉलिसी वितरणानंतरही पुढे सुरू असून याचाही लाभ घ्यावा. आपल्या परिसरातील विविध संस्था किंवा फर्म मार्फत सभासद, कर्मचारी किंवा ग्राहकांना दीपावलीनिमित्त देण्यात येणाऱ्या विविध भेटवस्तूही होलसेल दरात देण्याची सोय केली असून त्याची ऑर्डरही संस्था स्वीकारत असल्याचे दामोदर सुतार यांनी सांगितले. तांदूळ महोत्सव, आंबा महोत्सव, महिलांच्यासाठी हळदीकुंकू, महिला मेळावा, ग्राहक संरक्षण विमा योजना यासह विविध उपक्रम ग्राहकांच्या भरघोस प्रतिसादावर यशस्वी होत आहेत. असाच प्रतिसाद या लकी ड्रॉ योजनेला मिळेल असा आशावाद दामोदर सुतार यांनी व्यक्त करून लकी ड्रॉ ची सोडत शुक्रवार दिनांक ११ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता दत्त भांडार मध्ये होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आभार दत्त भांडारचे जनरल मॅनेजर सदानंद घोरपडे यांनी मानले.

यावेळी श्री दत्त कारखान्याचे संचालक दरगू गावडे, डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील शिरोळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन शामराव पाटील, प्रा. मोहन पाटील, दादा काळे यांच्यासह दत्त भांडार चे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post