अंबप येथेअनोळखी तरुणाचा खून , मृतदेह पेटवून देऊन पुरावा नष्ट करण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस

 वडगाव पोलीस ठाण्यात अनोळखी मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर  :  हातकणंगले जवळील अंबप या ठिकाणी शेतात २५ ते ३० वयोगटातील अनोळखी तरुणाचा खून करून मृतदेह पेटवून देऊन पुरावा नष्ट करण्याचा खळबळजनक प्रकार गुरुवारी पहाटे उघडकीला आला.या प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात अनोळखी मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

खून झालेल्या तरुणाची गुरुवार दुपारपर्यंत ओळख पटलेली नव्हती. हा खून नेमक्या कोणत्या कारणातून झाला आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले की, अंबप तालुका हातकणंगले येथील शिवकांत पाटील यांच्या उसाच्या शेतात पाण्याच्या पाटा मध्ये एका अनोळखी तरुणाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला.

पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाड यांनी वडगाव पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. पोलिसांनी पाहणी केली असता मृतदेहाचे हात-पाय दिसून आले नाहीत. शिवाय चेहऱ्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न मारेकरांनी केल्याचे दिसून आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी खून करून पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा नोंद केला आहे. अज्ञाताचा मृतदेह कोल्हापूरच्या सीपीआर रूग्णालयात ठेवण्यात आला आहे. दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजाणे यांनी तपासास मार्गदर्शन केले. अधिक तपास पोलीस निरीक्षक भैरव तळेकर करीत आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post