पोलिस शांतता कमिटी तर्फे शेख मोहम्मद मुन्तखबुद्दीन (शेख मुन्नाभाई) यांना विशेष सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
प्रेस मीडिया लाईव्ह :

जीलानी उर्फ मुन्ना शेख :

 पुणे  : पुणे पोलीस शांतता कमेटी  तर्फे रमाबाई रानडे हॉल, स. प. महाविद्यालय, पुणे येथे नुकताच पुरस्कार वितरणाचा कार्येक्रम संपन्न झाला .


या पुरस्कार वितरण मध्ये लोकमान्य जिवन गौरव पुरस्कार माणिकराव बाबुराव चव्हाण ( विश्वस्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट),  गणेश सेवा पुरस्कार श्री. सर्वेश प्रदीप पवार, श्री. स्वप्नील नहार (पुणे गणेश फेस्टिव्हल ) विशेष सन्मान शेख मोहम्मद मुन्तखबुद्दीन (शेख मुन्नाभाई ) (पोलीस शांतता कमिटीचा पुरस्कार ) पुणे पोलिस आयुक्त  यांचे हस्ते देण्यात आला.

आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्कार श्री. धिरज रामचंद्र घाटे (साने गुरुजी तरुण मंडळ) श्री. प्रितम विजय शिंदे ( हिंद माता मंडळ नाना पेठ) श्री. रफिक शरमुद्दिन शेख (जय शिवाजी तरुण मंडळ) श्री. आनंद दत्ता सागरे (वीर हनुमान मित्र मंडळ)

श्री. प्रल्हाद भाऊ विठ्ठल थोरात ( श्री शिवाजी मित्र मंडळ भवानी पेठ) श्री. निलेश रमेश पवार ( वाघजाई मित्र मंडळ फाउंडेशन पर्वती). सदरचा कार्येक्रम  मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास विशेष परिश्रम ॲड. प्रताप दादा परदेशी (अध्यक्ष) श्री. शिरीष मोहिते (कार्याध्यक्ष) श्री. विनायक घाटे (कार्याध्यक्ष) यांनी घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post