पनवेल महानगरपालिकेचे मा.विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या सौजन्याने पिरकोन येथे महाआरोग्य शिबिर संपन्नप्रेस मीडिया लाईव्ह

सुनील पाटील

 शेतकरी कामगार पक्ष व जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि ग्राम पंचायत, पिरकोन यांच्या वतीने पिरकोन, उरण येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर रविवार दि.२१ ऑगस्ट रोजी संपन्न झाले. या शिबिरामध्ये सांधेदुःखी, दातांची तपासणी आणि डोळे तपासणी करण्यात आले.

   सांधेदुखी च्या रुग्णांना मोफत गोळ्या औषधे देण्यात आले तसेच डोळ्यांची तपासणी करून ज्या रुग्णांमध्ये मोतिबिंदूचे लक्षणे आढळले अशा रुग्णांवर मंगळवार दि.२३/०८/२०२२ रोजी नवीन पनवेल येथील नायर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात आले. हा आरोग्य शिबिरात समृद्धी क्लीनिक, समृद्धी डेंटल केअर, नायर सुपरस्पेशालिटी आय हॉस्पिटल, नवदृष्टी सेवा संस्था, ट्रू डायग्नो यांनी नागरिकांना मोफत सेवा देऊन शिबीर यशस्वी पार पाडले.

      या शिबिराचे उदघाटन मा.जि. प सदस्य जीवन गावंड, सरपंच रमाकांत जोशी, डॉ.मंदार शहा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उदघाटन प्रसंगी पिरकोन ग्रापंचायतीचे मा.सरपंच हरेंद्र गावंड, चेअरमन श्री.अनंता गावंड, शिक्षक श्री.जगदीश गावंड, आदर्श शिक्षक श्री.विलास गावंड,सदस्य श्री.सुरेंद्र गावंड, सदस्य श्री.सुधीर गावंड व अन्य मान्यवर व गावकरी उपस्थित होते.

      या शिबिरासाठी सांधे आणि हाडांच्या रोगाचे तज्ञ डॉ.मंदार शहा, दंतरोग तज्ञ डॉ.भाग्यश्री शहा, नायर आय केयर रुग्णालयाचे सर्वेसर्वा डॉ.संतोष कुमार नायर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.मनस्वी भिंगार्डे आणि टीम, ट्रू डायग्नोचे श्री.परेश पाटील, श्री.सुशांत पाटील, सौ.प्रिया पाटील, श्री.अक्षय कोळी, श्री.विक्रांत ठोकले यांनी मोफत सेवा दिली. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी श्री.जगदीश गावंड, श्री.रोहन गावंड, श्री.मनिराम गावंड, श्री.भाई पाटील, श्री.प्रमोद गावंड, श्री.आनंद जोशी, श्री.संतोष मोकल, श्री.माधव गावंड, निलेश गावंड यांनी विशेष सहकार्य केले.

कोट:-

ग्रामीण भागात बारमाही शेतीची कामे केली जातात. यामुळे शेतकरी बांधवांना सांधेदुखी, आणि डोळ्यांचे आजार मोठ्याप्रमाणावर पहावयास मिळतात. आरोग्य शिबीर राबवून सेवा देण्याचा प्रामाणीक प्रयत्न करीत आहे. -प्रितम जनार्दन म्हात्रे, अध्यक्ष जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था

कोट

प्रितम म्हात्रे यांनी आमच्या गावातील ग्रामस्थांना मोफत आरोग्य शिबीर राबवून आणि मोतीबिंदुच्या शस्त्रक्रिया मोफत करून दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो.-रमाकांत कृष्णा जोशी-

सरपंच, ग्रामपंचायत पिरकोन

Post a Comment

Previous Post Next Post