को -ऑपरेटीव्ह संस्था कष्टकरी माणसाच्या पाठीशी उभे राहण्यासाठी उपयोगी पडतात - खासदार श्रीरंग बारणे



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : पुण्यनगरी ही अशी जागा आहे जिथे कोणीही उपाशी झोपले नाही. या शहाराने कोणाला तसे झोपू ही दिले नाही. मी इथला भूमीपुत्र आहे. इथल्या कष्टकरी माणसाच्या पाठीशी उभे राहण्यासाठी, अर्थ सहाय्य करण्यासाठी  को -ऑपरेटीव्ह संस्था उपयोगी पडतात, असे मत खासदार श्रीरंग बारणे यांनी आज व्यक्त केले.

गुरूकृपा मल्टिपर्पस (मल्टिस्टेट) को -ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड या पतसंस्थेचा शुभारंभ आज खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिव व्याख्याते नामदेवराव जाधव, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, गुरूकृपा मल्टिपर्पस (मल्टिस्टेट) को -ऑपरेटीव्ह सोसायटीच्या चेअरमन श्रावणी संतोष चव्हाण आणि एस स्क्वेअर एंटरटेनमेंट आणि सर्वज्ञ नाट्य संस्थेचे अध्यक्ष  संतोष चव्हाण, सहकार आयुक्त पुणे अनिल कवडे,  पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, आमदार सुनील शेळके, आमदार महेश लांडगे, आमदार अण्णा बनसोडे, माजी नगरसेवक शंकर जगताप, माजी नगरसेविका सुमन पवळे, माजी नगरसेवक सचिन चिखले, माजी नगरसेविका पौर्णिमा सोनवणे, माजी नगरसेवक प्रवीण भालेकर, माजी नगरसेविका संगीता ताम्हाणे, माजी नगरसेवक पंकज भालेकर, शांताराम द. भालेकर, शांताराम को. भालेकर आदी मान्यवर  उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, सर्व सामान्य नागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी शहराच्या विविध भागात अशा प्रकारच्या संस्था कार्यरत आहेत. गरजू व्यक्तींना कर्जाच्या माध्यमातून मदत करत असतात. संतोष चव्हाण यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. भूमीपुत्र या नात्याने जी काही मदत लागेल ती मी करेल.

मेघराजराजे भोसले म्हणाले, चित्रपट, नाट्य निर्माते संतोष चव्हाण यांनी कोरोना काळात कलाकारांसाठी मोठे काम केले आहे. कलावंतांच्या पाठीशी सदैव उभे राहणारे चव्हाण आता  सर्वसामान्य नागरिकांसाठी पतसंस्थेच्या माध्यमातून पुढे येत आहेत.

एस स्क्वेअर एंटरटेनमेंट आणि सर्वज्ञ नाट्य संस्थेचे अध्यक्ष  संतोष चव्हाण म्हणाले, सर्वसामान्य आणि गरजु लोकांसाठी गुरूकृपा मल्टिपर्पस (मल्टिस्टेट) को -ऑपरेटीव्ह सोसायटी काम करेल. कलाकार आणि तंत्रज्ञ याच्या पाठीशी उभे राहण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.

Post a Comment

Previous Post Next Post