स्टार्टअप यात्रेची हातकणंगले मधून सुरुवातप्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर, दि. 26 (जिमाका): महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता रथ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हातकणंगले येथून स्टार्टअप यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. 

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी, हातकणंगले तालुक्यातील विविध क्षेत्रातील उद्योजक, संस्थेचे प्राचार्य टी.एस. मिसाळ यांच्या हस्ते फीत कापून स्टार्टअप व्हॅनचे उदघाटन करण्यात आले. यात हातकणंगले तालुक्यातील विविध क्षेत्रातील उद्योजक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था हातकणंगले, सर्व खासगी औद्योगिक प्रशिक्षण. संस्था, तंत्रविद्यालय व व्यवसाय शिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थी व सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी  झाले.

रथ यात्रेसोबत आलेले अक्षय गोपनारायण व समन्वयक संजय माळी यांनी शासनाच्या स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेच्या निमित्ताने विविध योजना, उपक्रम, विविध कौशल्य स्पर्धा याबाबतचे मार्गदर्शन केले आणि रथयात्रेसोबतच्या डिजीटल प्रोजेक्टरव्दारे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गटनिदेशक एम.एस. सातव यांनी व उपस्थितांचे आभार संस्थेचे प्राचार्य तिमथ्य मिसाळ यांनी  मानले.


Post a Comment

Previous Post Next Post