महंमद रफी यांच्या गीतांची बहारदार मैफलप्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी  ता. २ हिंदी चित्रपट सुट्टीतील पार्श्वगायनाच्या क्षेत्रावर स्वातंत्र्यानंतरची दोन दशके मोहम्मद रफी यांनी आपल्या तरल - तलम गायकीने अधिराज्य गाजवले.मानवी जीवनातील सर्व भावभावना काळजापर्यंत पोहोचवणारा त्यांचा आवाज हा प्रत्येक भारतीयाला आपला वाटत होता. असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व कलारसिक  अहमद मुजावर यांनी व्यक्त केले.कलाप्रेमी ग्रुप आणि प्रबोधन वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने महंमद रफी यांच्या बेचाळीसाव्या स्मृतिदिनाच्या मैफलीचे उद्घाटन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक व रफी यांचे चाहते अजित मिणेकर होते. अरुण दळवी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.या वेळी अहमद मुजावर, अजित मिणेकर, प्रसाद कुलकर्णी, अरुण दळवी यांनी महंमद रफी यांच्या गाण्याचे किस्से,बारकावे,घटना यांची माहिती दिली.

अरुण दळवी यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने रंगलेल्या या मैफलीमध्ये अर्जुन रंगरेज  (बार बार देखो हजार बार देखो ), अजित मिणेकर  (ये दुनिया ये महेफिल,आखों मे कयामत के काजल ) भाऊसाहेब केटकाळे (चाहूंगा मै तुझे सांज सवेरे )फिरोज खैरदी ( सर जो तेरा चकराये, दिन ढल जाये ) संभाजी सोनकांबळे (जानेवाले जरा मुडके देखो मुझे, मेरे दोस्त किस्सा ये क्या हो गया ),अरुण दळवी ( छु लेने दो नाजूक होटों को ) अर्जुन रंगरेज व अरुण दळवी ( गुलाबी ओंखे जो 'तेरी देखी ) यासह अनेक गाणी सादर केली. समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात झालेल्या या मैफलीला मंजुनाथ कोरवी,तुषार कुडाळकर यांच्यासह अनेक रफी प्रेमी व  सिनेगीत चाहते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post