हर घर मे तिरंगा आणि देश प्रेम



प्रेस मीडिया लाईव्ह :

आजादी का अमृत महोत्सव  अंतर्गत दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022  प्रत्येक घर ,ऑफीस ,शाळा सगळ्या ठिकाणी तिरंगा उभारण्यासाठी घर घर  तिरंगा अभियान चालवण्यात येत आहे त्याबद्दल काही गोष्टी मला मनापासून वाटतात .त्या आपल्या सोबत शेअर करत आहे .

     घर घर तिरंगा याअंतर्गत प्रत्येक घर ,ऑफिस, शाळा या ठिकाणी तिरंगा आपण फडकवणार आहोत पण ह्या तिरंग्याचा अभिमान फक्त दोन दिवसासाठी आहे का ? आणि दोन दिवसानंतर म्हणजे 16 ऑगस्टला त्या तिरंग्याचे काय होणार?  काही तिरंगे हे कागदी असतील, काही तिरंगे हे प्लास्टिकचे असतील, काही तिरंगे हे कापडाचे असतील पण दोन दिवसांचे अभियान झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी ह्या तिरंग्याच काय होणार? 

तर मला असे वाटते की ...दोन दिवसाचे घर घर तिरंगा अभियान झाल्यानंतर  पुढे तो तिरंगा रस्त्यावर फेकला जाऊ नये,  तिरंगा कोणाच्या पाया खाली येता कामा नये   .तिरंग्याचा अवमान होता कामा नये असे मला वाटते .त्यामुळे घर घर तिरंगा ठीक आहे पण  प्रत्येक घराघरातील  माणसाच्या मनामध्ये तुम्ही तिरंगा कसा फडकवणार  ?फक्त दोन दिवस घरावरती तिरंगा फडकवून खरंच देशप्रेमाची भावना लोकांच्या मनामध्ये जागृत होणार आहे का?  

पण मला असं वाटतं की... लोकांच्या मनामध्ये  देशप्रेम जागृत होण्यासाठी संविधानातील मूलभूत कर्तव्य मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे प्रत्येकाच्या मना मनामध्ये रुजवण्याची आज काळाची गरज आहे . देश प्रेम हे मनातून आलं पाहिजे काही गोष्टी दिखाव्यासाठी नसाव्यात. सणा मधून ऐक्याची भावना निर्माण व्हावी. तिरंगे उभे करण्यापेक्षा  प्रत्येकाच्या मनामध्ये तिरंगा फडकवण्याची जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे असं मला वाटतं फक्त दोन दिवस 13 ते 15 ऑगस्ट या दोन  दिवसांमध्ये  तिरंगा  घरावरती उभारून प्रत्येकाच्या मनामध्ये देशप्रेम जागृती होईल का ?याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे . देशप्रेम जागृत व्हायचं असेल तर संविधाना प्रति आपली भावना चांगली असली पाहीजे. 

    घर घर मे तिरंगा ठीक आहे . पण  त्या  तिरंग्याचा  16 ऑगस्टला किंवा त्या दोन दिवसाच्या घरघर अभियानानंतर   तिरंग्याचा अवमान होऊ नये एवढीच माझी अपेक्षा आहे ...तो तिरंगा कुठे पायाखाली येता कामा नये तो तिरंगा कुठे रस्त्यावर पडलेला धूळ खात पडलेला आपल्याला दिसता कामा नये कारण हा आपल्या राष्ट्राचा अपमानच असणार आहे . घर घर मे तिरंगा अभियानामध्ये आपण  प्रत्येकजण सामील होणार आहोत त्या प्रत्येकाने आपल्या तिरंग्याचा अवमान होणार नाही याची प्रत्येकाने जबाबदारी घेणे गरजेचे आहे .

 प्लास्टिकचे  तिरंगे तुम्ही विकत घेऊ नका असे मला वाटते कारण प्लास्टिकच्या तिरंगा मुळे प्लास्टिकच्या प्रदूषणात आणखी मोठी भर पडणार आहे असे मला वाटते  त्यामुळे प्लास्टिक प्रदूषण जास्तच प्रमाणात वाढ होणार आहे त्यामुळे प्लास्टिकच्या तिरंग्यावर बंदी आणली पाहिजे .

 शेवटी मला सर्वांना एकच गोष्ट सांगावीशी वाटते ...एक-दोन दिवस घरावर तिरंगा उभारून लोकजागृती किंवा लोकांच्या मनामध्ये प्रेम निर्माण करण्यापेक्षा कायमस्वरूपी लोकांच्या मनामध्ये देशाविषयी प्रेम जागृत होणे गरजेचे आहे त्यामुळे जरी घर घर तिरंगा हे ह्या अभियानांतर्गत जरी प्रत्येकाने तिरंगा जरी लावला तरी प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवावी की ...या तिरंग्याचा फक्त दोन दिवसासाठी  दिखावा म्हणून वापर करू नये आणि नंतर कुठेतरी तो रस्त्यावर वगैरे फेकला जाऊ नये तिरंग्याचा अवमान करू नये हीच सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे  .

आणि मला असं वाटतं की ...ज्या लोकांच्या दोन वेळच्या जेवणाचीही परवड होत आहे ज्या लोकांना खायला अन्न मिळत नाही निदान आजादी का अमृतमहोत्सव घर घर मे तिरंगा अभियान   अंतर्गत  तुमच्या आजूबाजूला काही लोक गरीब लोक असतील आणि तुम्ही त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय करु शकला तरी आपण देशाप्रती खूप साऱ्या गोष्टी केल्या सारखे आहे... किंवा आपल्या आजूबाजूला जे काही गरीब लोक दिसतील त्यांना आपण जर मदत करू शकलो तरी आपण आपल्या देशाप्रती कर्तव्य पार पाडल्याचे आपल्याला समाधान नक्की मिळेल .असं मला वाटतं....

सौ श्वेता सचिन चौगुले - निर्मळे

Shweta.chougule5583@gmail.com

Post a Comment

Previous Post Next Post