गणपती विसर्जन पंचगंगा नदीत व्हावे यासाठी

 लोकक्रांती विकास आघाडीच्या वतीने मा. श्री एकनाथजी शिंदे (मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ) यांना निवेदन


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे

लोकक्रांती विकास आघाडीच्या वतीने गणपती बाप्पाचे विसर्जन पंचगंगा नदीत व्हावे यासाठी मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब  (मुख्यमंत्री  महाराष्ट्र राज्य )मा श्री  दिपक केसरकरजी, राहुल रेखावर ( जिल्हाधिकारी कोल्हापूर )यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे 

इचलकरंजी प्रशासनाकडून गणपती विसर्जन शहापूर खणीमध्ये करण्यात यावे असे सांगितले जाते परंतु खणीमध्ये घाण पाणी असून प्रोसेसचे केमिकल युक्त पाणी सोडले जाते तसेच जवळ असलेल्या लोकवस्ती मधील मलयुक्त खाणीत सोडले जाते त्यामुळे केंदाळ भरपूर झाले असताना त्याठिकाणी  गणपती विसर्जन करायचे का ? हा प्रश्न आहे.

जर न्यायालयाचे आदेश असतील तर पंचगंगा नदीवर कुंड तयार करण्यात यावा व गणपती विसर्जन कुंडामध्ये करण्यात यावे गणेशभक्तांच्या भावनांशी न खेळता इचलकरंजी शहरातील कायदा व सुव्यवस्था बाधा येईल असे काही घडू नये  याची दक्षता घ्यावी पूर्वीपासून चालत आलेली परंपरा एसटी स्टॅन्ड -जनता चौक -गांधी पुतळा -राजवाडा या ठिकाणी गर्दी असते.

त्यामुळे काही व्यापाऱ्यांचा उदरनिर्वाह या विसर्जन मिरवणुकीमुळे चालत असतो त्यामुळे आपण याविषयाकडे गांभीर्याने विचार करावा. न्यायालयाला ही बाधा न येता कुंडामध्ये  विसर्जन पंचगंगा नदीवर विसर्जन व्हावे असे आमच्या संघटनेच्यावतीने मागणी आहे या पत्रांचा खुलासा लवकरच लवकर मिळावे असे निवेदनात म्हटले आहे 

याप्रसंगी लोकक्रांती विकास आघाडीचे अध्यक्ष दत्तात्रय मांजरे  (तारदाळकर) उपाध्यक्ष नागेश क्यादगी जिल्हाध्यक्ष अशोक ठोमके खजिनदार मुकुंद शेंडगे श्रीकांत कांबळे यांनी निवेदनावर स्वाक्षरी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post