आजी माजी आमदारांसह खासदारांनी यंञमागधारकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी शहरातील आजी-माजी आमदार आणि विद्यमान खासदारांनी एकत्रित येऊन यंत्रमागधारकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी प्रसिध्दी पञकाव्दारे केली आहे.

यंत्रमाग व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून डळमळीत झाला आहे. बरेच साधे यंत्रमागधारक या व्यवसायातून बाहेर पडत आपले यंत्रमाग भंगारमधे विक्री करत आहेत. तसेच आर्थिक मिळकतीचा पर्याय म्हणून इतर व्यवसायाकडे अथवा नोकरीकडे वळत आहेत. त्यात अत्याधुनिक यंत्रमागधारकांना देखील विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. असे असले तरी आजी माजी आमदार व विद्यमान खासदार हे आता राज्याबरोबरच केंद्रातील सत्तेत सहभागी आहेत.

राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर वेगवेगळ्या मुद्द्यांवर लोकप्रतिनिधी मंत्र्यांना निवेदन देत आहेत. परंतु यंत्रमागधारकांच्या समस्या संदर्भात अजून तरी एकही निवेदन दिले गेले नाही.त्यामुळे यंञमाग उद्योगातील समस्या सोडवण्यासंदर्भात ही उदासीनता का ? याची खंत आहे. वास्तविक यंञमाग उद्योग व या उद्योगातील सर्वच घटक जगले पाहिजेत , यासाठी आजी माजी आमदार व खासदारांनी एकत्रित येऊन यंत्रमागधारकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी प्रसिध्दी पञकाव्दारे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post