एन.एम.एम.एस.परीक्षेत रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनचे यश

यशाबद्दल महापालिकेने केला विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा सत्कार


प्रेस मीडिया लाईव्ह :

केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या एन.एम.एम.एस.स्पर्धा परीक्षेत इचलकरंजी महापालिका संचलित रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळा क्रमांक २७ ने घवघवीत यश संपादन करत शहरात अव्वल स्थान पटकावले.या परीक्षेत सलग दुसऱ्या वर्षी शहरात अव्वल स्थान पटकावत यशाची परंपरा कायम राखली आहे.या यशाबद्दल महापालिका प्रशासनाच्या वतीने प्रशासक सुधाकर देशमुख व उपायुक्त डॉ.प्रदीप ठेंगल यांच्या हस्ते विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

इचलकरंजी महापालिका संचलित रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळा क्रमांक २७ मध्ये नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात.विशेषत: शिक्षकांकडून विद्यार्थ्यांची खेळाबरोबरच स्पर्धा परीक्षांसाठी चांगली तयारी करुन घेतली जाते.त्याचेच फलित म्हणजे यंदाच्या वर्षी घेण्यात आलेल्या केंद्र शासनाच्या एन.एम.एम.एस.परीक्षेत या विद्यालयाने सलग दुसऱ्या वर्षी शहरात अव्वल स्थान पटकावले आहे.त्यामुळे या विद्यालयाचे १७ विद्यार्थी प्रत्येकी ४८ हजार रुपये शिष्यवृत्तीचे मानकरी ठरले आहेत.या यशाबद्दल सदर विद्यार्थी व शिक्षकांचा महापालिकेचे प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख व उपायुक्त डॉ.प्रदीप ठेंगल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच शैक्षणिक कार्याच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे ,माजी नगरसेविका सुनिता मोरबाळे , नगरसचिव विजय राजापुरे , क्रीडा अधिकारी व शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर पोवार , रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक विद्याधर भाट ,शिक्षिका अलका शेलार , राजेंद्र घोडके , दिनेश पाखरे यांच्यासह सर्व शिक्षक - शिक्षिका , विद्यार्थी व पालक उपस्थित होते.दरम्यान , रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनने एन.एम.एम.एस.परीक्षेत यश मिळवत सलग दुसऱ्या वर्षी शहरात अव्वल स्थान पटकावले आहे.‌याबद्दल या विद्यानिकेतनचे सर्व स्तरातून मोठे कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post