माहेश्वरी युथ फौंडेशनच्या वतीने खेळाडूंना सायकल प्रदान

इचलकरंजी येथे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून माहेश्वरी युथ फौंडेशनच्या वतीने माय सायकल उपक्रमांतर्गत

कबड्डीसह खो - खो खेळातील गरजू खेळाडूंना सायकल प्रदान करण्यात आल्या.


प्रेस मीडिया लाईव्ह :

माहेश्वरी युथ फौंडेशनच्या वतीने सामाजिक व धार्मिक कार्यात पुढाकार घेतला जात़ो.यासह विविध विधायक उपक्रम देखील सातत्याने राबवण्यात येतात.याच अनुषंगाने माय सायकल उपक्रमांतर्गत समाजातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना सायकल प्रदान करण्यात येतात.घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असूनही अभ्यासाबरोबरच कबड्डी,खो -खो खेळात चांगली कामगिरी करण्यासाठी काही विद्यार्थीनी धडपड करत आहेत.त्यांना या कार्यासाठी पाठबळ मिळावे ,या उद्देशाने माहेश्वरी युथ फौंडेशनच्या वतीने गणेशचतुर्थीचे औचित्य साधून प्रांजल पोवार ,जुबेन मुल्ला , श्रध्दा खामकर या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सायकल प्रदान करण्यात आल्या.यावेळी फौंडेशनचे

रामेश्वरलाल बांगड , वासुदेव बांगड ,राजू बांगड ,वरुण बांगड , संतोष बाहेती , महेश बाहेती , सुनील बांगड , अभिषेक परतानी , शैलेंद्र बिडला ,शरद झंवर ,शेखर बांगड , गोपाल चांडक ,बालाप्रसाद भुतडा ,अरुण बांगड यांच्यासह खेळाडू उपस्थित होते.या सामाजिक उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post