तुमचं तुमच्या मुलांवर लक्ष आहे ना ? तरुण मुलं जातायत ई सिगारेटच्या आहारी



प्रेस मीडिया लाईव्ह

  रायगड जिल्हा : सुनील पाटील

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : तुमची मुलं काय करतायत? तुमच्या मुलांवर तुमचं लक्ष आहे का? हे प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे फॅशन आणि ट्रेंडिंगच्या नावाखाली तरुण मुलं व्यसनाधीन होत चालली आहे.

सध्याच्या ई जमान्यात मुलं ई सिगारेटच्या आहारी जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अगदी शाळेपासून कॉलेजमधल्या तरुणांपर्यंत ई सिगारेटची प्रचंड क्रेझ आहे. ई सिगारेट उत्पादन तसंच आयात-निर्यात आणि विक्री करण्यास केंद्र सरकारने बंदी घातलं आहे, पण भारतात याची सर्रास विक्री केली जात आहे. ई सिगारेटमुळे धूम्रपान सोडण्यास मदत होते, असं विक्रेत्यांकडून भासवलं जातं.

त्यामुळे ई सिगारेट ओढण्याकडे तरुणाईचा कल अधिक आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. शाळा आणि कॉलेजमधील विदयार्थी आणि तरूणांना इलेक्ट्रॉनिक सिगारेट विक्री करणाऱ्या 12 ठिकाणांवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत एकूण 14 लाख 60 हजार 420 रूपयांची इलेक्ट्रॉनिक सिगारेट जप्त करण्यात आली आहे.

मुंबईमधील विविध ठिकाणी ई सिगारेटचा साठा व विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी मुंबईतील पाली नाका, खार, लोखंडवाला अंधेरी, मालाड इथल्या 11 दुकानं आणि ऑनलाईन पद्धतीने विक्री करणारे अशा 12 ठिकाणांवर छापा कारवाई केली.

धूम्रपान सोडण्यासाठी ई सिगारेट चा वापर करावा असं सांगितले जातं. मात्र हे चुकीचे असून या ई सिगारेट मूळे नैराश्य येण्याची शक्यता दुप्पट असते. ई सिगारेटचे व्यसन करणाऱ्यांना हृदयविकाराचा झटका येणं, रक्ताच्या गुठळ्या होण्याची समस्याही उद्भवण्याची शक्यता आहे तसंच निकोटीन असल्याने कॅन्सर देखील होऊ शकतो

पोलिसांनी केलेल्या कारवाईत 11 जणांना अटक केली असून 14 लाखाचा अवैध सिगारेट जप्त केली आहे, त्यामुळे ई सिगारेट ओढल्याने धूम्रपान सोडणे दूरच उलट व्यसनाधीन होण्याची शक्यताच जास्त आहे

Post a Comment

Previous Post Next Post