भारतीय जनता पार्टी कर्जत विधानसभा, युवक प्रतिष्ठान आणि संकल्प सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने रास्त दरात श्रवण यंत्र वाटप शिबिर आयोजित केलेप्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा : सुनील पाटील

  भारतीय जनता पार्टी कर्जत विधानसभा, युवक प्रतिष्ठान आणि संकल्प सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने रास्त दरात श्रवण यंत्र वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी 64  लोकांना पाचशे रुपयांमध्ये यंत्र देण्यात आली. इतर रुग्णांची तपासणी करून पुढील उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा  सल्ला घेण्यासाठी सांगण्यात आले.  या शिबिरास कर्जत  मधील  लोकांचा  उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक करून  आम्हाला अत्यल्प दरात श्रवण यंत्र मिळाल्या बाबत  समाधान  व्यक्त केले.. याप्रसंगी मुबंई महापालिकेचे  नगरसेवक निल सोमय्याजी आवर्जून  उपस्थित राहिले. त्यांनी *ऐका  स्वाभिमानाने * या मोहिमे अंतर्गत होणाऱ्या या उपक्रमबाबत  माहिती दिली. ही श्रवण यंत्रे साधारणपणे बाजारात 9 ते 10  हजाराला मिळतात परंतु युवक प्रतिष्ठानने ही मशिन्स  परदेशातून  खास  त्यांचे साठी  बनवून  घेतली  आहेत  असे सांगितले. ह्या यंत्राचे 500रुपये का घेतो  ते सुद्धा सांगितले. ह्याच पैशातून  अजुन अनेकांना ऐकू येऊ  त्यात आपला  खारीचा वाटा असावा यापुढेही  कर्जत मध्ये विविध उपक्रम राबाविण्यासाठी मदत  करू असे सांगितले. तसेच  सुनील गोगटे  आणि त्यांच्या सर्व सहकारी  भाजप  पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगीसुनिल गोगटे,वसंत भोईर,दिनेश सोळंकी,बळवंत घुमरे, मिलिंद खंडागळे,समीर सोहोनी,मारुती जगताप,नितीन कंदळगावकर,सूर्यकांत गुप्ता,प्रमोद पाटील,श्रीनिवास राव,दिनेश गणेगा,राहुल मसणे,सर्वेश गोगटे,हारीशचंद्र मांडे,विजय कुलकर्णी,सार्थक घरलुटे,अभिनय खांगटे ,दर्पण घारे,कल्पना दस्ताने,स्नेहा गोगटे, नम्रता कंदळगावकार ,अश्विनी अत्रे,सुमीता, महर्षी,मानसी खेडेकर,स्वप्ना सोहोनी भाऊ  राठोड  रमेश राठोड असे बहुसंख्य भाजपचे  पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post