विंचू व सापाने दंश केल्यास जिल्हा रुग्णालयातच दाखल करावे= जयपाल पाटील



प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा : सुनील पाटील

आपल्या शेतावर अथवा घरांमध्ये विंचू दंश किंवा साप चावल्यास यासाठी जिल्हा रुग्णालयात औषध उपलब्ध असल्याने तेथे  108 रुग्णवाहिका बोलावुन पाठविणे त्याचबरोबर शेतावर जाता-येताना पायामध्ये गम बूट चा वापर करवा म्हणजे आपली व आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे होईल असे मार्गदर्शन रायगड भूषण आपत्ती व्यवस्थापन तज्ञ जयपाल पाटील यांनी केले. ग्रामपंचायत वाघोडे यांनी मरूआईमंदिर सभागृहात  आयोजित केलेल्या आपत्ती व्यवस्थापन शिबिरात व्यासपीठावर सरपंच कृष्णा जाधव,रायगड भूषण जयपाल पाटील, ग्रामसेवक निलेश गावंड, माजी सरपंच सुनील माने वसुधा पाटील, मुकेश नाईक ग्रामपंचायत सदस्य, डॉक्टर रामकृष्ण उघडे हे होते.     

प्रारंभी सरपंच कृष्णा जाधव यांनी रायगड भुषण जयपाल पाटील व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले,प्रास्ताविकात सांगितले की जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांचे आभार मानून ग्रामस्थांच्या सुरक्षेची काळजी व महत्वाची माहिती जयपाल पाटील आज आपल्याला देणार असल्याचे सांगितले. यावेळी जयपाल पाटील यांनी साप व विंचू दंश झाल्यास 108 रुग्णवाहिका बोलवावी यावेळी डॉक्टर निर्मला डांगे 108 सहित उपस्थित झाल्या, महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस दलाचा 112 क्रमांक वापर करतात पोयनाड पोलीस ठाणे वरून रोड्रिक्स, अमोल म्हात्रे मांजरेकर व जांभरे महिला पोलीस कार्यक्रम स्थळी उपस्थित झाल्या. 

गावातील महिलांना बाळंतपणासाठी नेण्यासाठी 102 रुग्णवाहिकेचा कसा वापर करावा याचे प्रात्यक्षिक चिखली आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉक्टर विशाखा पाटील यांनी आल्लाद पिंगळे वाहन चालकाला रुग्णवाहिका घेऊन पाठविले. यदा कदाचित जर विंचु अथवा साप चावुन  मृत्यू झाला शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना स्वर्गीय गोपीनाथ मुंडे विमा योजने द्वारे २ लाख रुपयाचा धनादेश त्यांच्या कुटुंबियांना जिल्हा कृषी अधिकाऱ्यांमार्फत मिळतो याची माहितीही दिली त्याच बरोबर घरातील वीजेच्या वस्तू ,लहान मुलांची सुरक्षा, पाणी बचत ची माहिती दिली. या कार्यक्रमास आरोग्य सहाय्यक विनोद पाटील मनोज पाटील, पोलीस पाटील हर्षदा माने, आरोग्य सेविका मंथना पाटील, गुलशन औसेकर व अतोनात पावसातही 60 ग्रामस्थ उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक निलेश गावंड यांनी केले तर  आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य वसुधा पाटील यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post