मा डॉक्टर किरण पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद यांस आपत्ती व्यवस्थापन तज्ञ जयपाल पाटील यांनी निवेदन दिले

 आपत्ती व्यवस्थापनसाठी प्रत्येक गावात, ग्रामपंचायती मध्ये मांगे (सायरन) लावणेबाबत..

प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा : सुनील पाटील

अचानक येणाऱ्या आपत्तीमध्ये भूकंप, ढगफुटी, चक्रीवादळे, महापूर यांची जिल्हा आपत्ती प्राधिकरणकडून मिळणारी माहिती त्वरेने ग्रामस्थांना मिळण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत होमध्ये भांगे (सायरन) बसवावेत. ज्यामुळे याचा दुसरा फायदा ग्रामस्थांना होईल असे गावातील एखादी कन्या जिल्हा सामान्य रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल केलो असताना तिला जर रक्ताची आवश्यकता असेल व तो कोणता ग्रुप याची माहिती ग्रामस्थांना तातडीने या भाग्याद्वार देण्यात येईल. आपल्या मान्यतेने रायगड जिल्ह्यातील ८०४ ग्रामपंचायतीमध्ये रायगडचा युवक फाऊंडेशनद्वारे आपत्तो व्यवस्थापनाचे धडे देण्याचे माझे कार्य सुरु आहे.

या यंत्रणेद्वारे गावातील एखाद्या तरुणाचा अपघात झाल्यास त्यालाही रक्ताची आवश्यकता भासल्यास याद्वारे सर्व ग्रामस्थांना त्वरेने कळविण्यात येईल व त्याचा लाभ त्या रुग्णाला मिळेल. त्याचबरोबर त्या गावातील एखाद्याचे निधन झाले तर स्मशानभूमीमध्ये कार्यक्रम किती वाजता होणार आहे याचीही माहिती याद्वारे कळविण्यात येईल. त्याचबरोबर केंद्र शासन व राज्य शासनाच्या आणि जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या महत्वाच्या सूचना गावातील नागरिक, शेतकरी हे आपल्या कामावर जाण्याच्या अगोदर या यंत्रणेद्वारे त्यांना कळविण्यात येतील.

तरी या उपक्रमाद्वारे नागरिकाना आपत्ती व्यवस्थापन व प्रशासनाच्या विविध योजना, सूचनांबाबत तात्काळ कळविण्याचे महत्त्वपूर्ण व समाजोपयोगी कार्य पार पाडण्याकरिता आपण याचा विचार करावा. 

Post a Comment

Previous Post Next Post