Presidential Election 2022 | अलिबागच्या आमदाराला मतदानाची परवानगी नाही; शिंदे गटाला धक्का



प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा :  सुनील पाटील

शिंदे गटातील अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. त्याच्यावरील एका गुन्ह्यातील आरोप सिद्ध झाल्याने परवानगी नाकारली आहे.

महाराष्ट्र विधानसभेत याची मतदान प्रक्रीया सुरू आहे. 

मुंबई : शिंदे गटातील (Shinde Group) आमदार महेंद्र दळवी (MLA Mahendra Dalvi) आमदार मतदान करू शकणार नाहीत. गुन्ह्यात आरोप सिद्ध (Prove To The Charge In Crime) झाल्याने ते मतदान नाकारण्यात आले (Vote Rejected) आहे. त्यामुळे राष्ट्रपती निवडणुकीत (Presidential Election) २८८ आमदारांपैकी २८४ आमदार मतदान करणार आहेत. त्यापैकी एका आमदाराचा मृत्यू झाला असून अनिल देशमुख, नवाब मलिक तुरुंगात आहेत.

राष्ट्रपती निवडणुकीत विधान भवनात मतदान प्रक्रीया सुरु आहे. एनडीएकडून (NDA) दौपदी मुर्मू (Draupadi Murmu), तर युपीएच्या वतीने यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभेत (Maharashtra Legislative Assembly) याची मतदान प्रक्रीया सुरू आहे. मात्र, सकाळी भाजपचे आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीची (MVA) मते फूटणार असल्याचा दावा केला आहे. मात्र, शिंदे गटातील अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. त्याच्यावरील एका गुन्ह्यातील आरोप सिद्ध झाल्याने परवानगी नाकारली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post