खंजिरे शिक्षण संस्थेच्या प्राथमिक विद्या मंदिरमध्ये मुलांची आरोग्य तपासणी

 लायन्स क्लबचे हेल्दी स्कूल उपक्रमांतर्गत शिबीर


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी / प्रतिनिधी

येथील देशभक्त बाबासाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या प्राथमिक विद्या मंदिरमध्ये लायन्स क्लबच्या वतीने हेल्दी स्कूल उपक्रमांतर्गत मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.या आरोग्य तपासणी शिबीरात प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.शोएब मोमीन यांनी मुलांची आरोग्य तपासणी करत औषधोपचार केले.तसेच पावसाळ्यात मुलांच्या आरोग्याची घ्यावयाची काळजी याविषयी मौलिक मार्गदर्शन केले.

इचलकरंजी लायन्स क्लबच्या वतीने विविध सामाजिक , आरोग्य विषयक सातत्याने उपक्रम राबवण्यात येतात.विशेष म्हणजेहेल्दी स्कूल उपक्रमांतर्गत महिन्यातून दोन वेळा शहर परिसरातील शाळांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात येत आहे.याच अनुषंगाने आज गुरुवारी  इचलकरंजी येथे देशभक्त बाबासाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या प्राथमिक विद्या मंदिरमध्ये बालरोग तज्ञ डॉ.शोएब मोमीन यांनी मुलांची आरोग्य तपासणी केली.तसेच पावसाळ्यात मुलांच्या आरोग्याची घ्यावयाची काळजी याविषयी मौलिक मार्गदर्शन केले.प्रारंभी लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र बालर , सेक्रेटरी सुभाष तोष्णीवाल, खजिनदार संदिप सुतार , कमिटी चेअरमन नंदकुमार बांगड , मुख्याध्यापिका सुचिता आलमान यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करुन आरोग्य तपासणी शिबीराचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी १७२ मुलांची आरोग्य तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले.तसेच मान्यवरांच्या हस्ते मुलांना माहिती पञक व खाऊ वाटप करण्यात आले.या शिबीरास लायन्सचे सदस्य सचिन येलाजा ,कांता बालर ,रेणू बांगड ,सदस्या कौशल्या सुतार ,शैलजा तोष्णीवाल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षिका सुजाता चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षिका कोमल आरेकर यांनी केले.यावेळी शिक्षिका तेजस्विनी काजवे , विद्या रावळ यांच्यासह पालक , विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post