ग्रुप ग्रामपंचायत कोन मध्ये "विधवा प्रथा" बंदीचा ठराव पास.



प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा : सुनील पाटील. 

ग्रुप ग्रामपंचायत कोन या गावी बुधवार दिनांक २७/०७/२०२२ रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत ने बोलावलेल्या विशेष ग्रामसभेमध्ये मा.श्री.दीपक धाया म्हात्रे सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक श्री.रमेश नामदेव तारेकर आणि काही ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झालेल्या ग्रामसभेत खालील विषयांवर चर्चा करण्यात आली व आयत्या वेळीच्या विषयामध्ये "विधवा प्रथा बंदीचा"  विषय चर्चेला घेतला.

१) स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमित्त घरोघरी तिरंगा उपक्रम राबविणे बाबत जनजागृती करणे.*

२) जल जीवन मिशन १०० टक्के नळ जोडणी आलेल्या गावांमध्ये "हर घर,हर जल" घोषित करणे बाबत.*

३) कोविड लसीकरणाबाबत जनजागृती करणे.*

४) आयत्या वेळचा विषय म्हणून "विधवा प्रथा मुक्त ग्रामपंचायत करूया.

वरील तीन विषयांवर ग्रामपंचायतचे सरपंच,ग्रामसेवक यांनी मांडलेल्या विषयावर प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर आयत्या वेळच्या विषयावर सभागृहामध्ये एक ग्रामस्थ व पत्रकार म्हणून श्री.अशोक नामदेव घरत यांनी गावोगावी अनेक ग्रामपंचायतींमध्ये "विधवा प्रथा मुक्त" ठराव मंजूर करून घेतलेले आहेत आणि त्या ठरावाची अंमलबजावणी सुद्धा अनेक गावांमध्ये होताना दिसून येत आहे.

भारतात स्वातंत्र्य पूर्व काळापासून चालत आलेली ही जुनाट प्रथा का मोडीत काढली पाहिजे त्याची कारणमीमांसाही समजावून सांगितली. मरणारी मृत व्यक्ती ही मरून जाते,त्याच्या पश्चात त्यांची अर्धांगिनी आणि त्यांची मुलं असा उर्वरित परिवार याची संपूर्ण जबाबदारी ही,त्या स्त्रीच्या वाट्याला येते.अशा परिस्थितीत तिने काबाड कष्ट करून त्या मुलांना लहानाचे मोठे करणे व शिक्षण देणे अशा जबाबदाऱ्या पेलत असताना, त्या स्त्रीला समाजातील काही विशिष्ट लोकांकडून विधवा स्त्री म्हणून टक्के टोमणे त्या माऊलीला ऐकायला मिळत असतात आणि सोबतच समाजाचा बघण्याचा दृष्टिकोनही बदललेला असतो.

मृत व्यक्ती मेल्यानंतर त्या स्त्रीच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून त्यांतील मणी काढून त्या व्यक्तीच्या तोंडात ठेवण्याची प्रथा बंद करायची असेल तर तिच्या गळ्यातील मंगळसूत्र न तोडता फक्त तुळशी पत्र तोंडात ठेवणे हे चालू करायचं.तसेच हातातील बांगड्या न फोडता तशाच ठेवायच्या आणि कपाळावरील कुंकू सुद्धा पुसायचे नाही.समाजात जेव्हा अशा पद्धतीचा प्रचार आणि प्रसार होईल त्या वेळेपासून त्या त्या स्त्रियांचा आपल्या समाजात कुठेच अपमान होणार नाही आणि ती एक स्त्री म्हणून सन्मानाने जगता येईल.*

अशा पद्धतीचा ठराव एकमताने मंजूर करून घेतला.या ठरावाचे सूचक अशोक नामदेव घरत गाव (कोन) आणि अनुमोदक ज्ञानेश्वर धोंडू बडे (माजी पंचायत समिती सदस्य,पनवेल) गाव अजिवली.तसेच ग्राम पंचायतचे मा.सरपंच बाळकृष्ण पाटील,मा.उपसरपंच जितेश बा.शिसवे,सदस्या सौ.आशा अ.घरत.सदस्या सौ.सुलोचना ज्ञा.भागित व ग्रामस्थांपैकी मा.उपसरपंच अशोक खं.म्हात्रे,मा.सदस्य गोविंद दा.पाटील बोर्ले गाव,आदेश ना.घरत,मा.सदस्य हरिभाऊ ना.कांबळे,मा.सदस्य नामदेव म.गाताडे,सौ.भारती अ.गव्हाणे,रोशन क.म्हात्रे,जितेश कांबळे,अजय गायकवाड आणि अनंत (आण्णा) म्हात्रे.*

Post a Comment

Previous Post Next Post