गावचावडी प्रभात संघाच्या वतीने शिवगोंडा खोत , अण्णा गुंठे यांचा निवडीबद्दल सत्कारप्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी येथे गावचावडी प्रभात संघ व राजवाडा चौक वृत्तपत्र विक्रेत्यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या सल्लागारपदी शिवगोडा खोत व सदस्यपदी अण्णा गुंडे यांची निवड झाल्याबददल त्यांचा डीवायएसपी बी.बी.महामुनी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

यावेळी सत्कारमूर्ती शिवगोंडा खोत यांनी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या माध्यमातून वृत्तपत्र विक्रेते बांधवांचे संघटन करतानाच त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरु असलेल्या लढ्याला अधिक पाठबळ देण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करणार असल्याची ग्वाही दिली.

यावेळी केएटीपी संस्थेचे व्हा.चेअरमन , माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते,यशवंत प्रोसेसचे चेअरमन अहमद मुजावर,नुतन बॅंकेचे चेअरमन प्रकाश पुजारी ,पत्रकार व वृत्तपत्र विक्रेते चिदानंद आलूरे,पत्रकार सुनिल मनोळे,अरुण काशिद , वितरण प्रमुख बंडू बुर्गे ,मनोज खेतमर , विक्रेते रवीद्र नवाळे,संजय हेब्बाळकर,राजु साने, संगिता हेब्बाळकर ,दत्ता चौगुले व पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी महेश बावळे,अमर मुसडे,भालचंद्र कांबळे,शिवानंद रावळ व वृत्तपत्र वाचक , नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post