मतदार राजाने जागे होणे आता काळाची गरज...

 नागरिकांना आता कळू लागले आहे की , नगरसेवक कसा निवडायचा ...

केवळ पैशांच्या जोरावर निवडून येऊ अश्या भ्रमात राहणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता तेवढे सोपे असणार नाही . 

प्रेस मीडिया लाईव्ह

अन्वरअली शेख

पुणे ,  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका जाहिर झाल्या तसे निवणुकीसाठी सज्ज होऊन उघड्या डोळ्यांनी नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहणारे ,इच्छुक असलेल्या अनेकजन आता जनतेशी संपर्क करताना दिसत आहेत .  या वेळी मात्र परिस्थिती वेगळी आहे . नगरसेवक  कसे असावेत  हे आता जनतेला कळू लागले आहे त्यामुळे या वेळी नगरसेवक निवडताना जनता जनार्दन अधिक दक्ष व जागरूकता दाखवणार आहे. केवळ पैशांच्या जोरावर निवडून येऊ अश्या भ्रमात राहणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता तेवढे सोपे असणार नाही . 

       नगरसेवक हा शब्द वापरला जाऊ लागला.

         नगरपालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्या सदस्यांना नगरसेवक असे म्हणतात. इंग्रजीत सिटी फादर्स. त्यावरून मराठीतही नगरपिते असा शब्द सुचविला गेला होता. पण पुणे शहराचे नागरिक असलेल्या आचार्य अत्र्यांनी आम्हांला इतके बाप नकोत अशी टिप्पणी केल्याने, त्यांच्याच सूचनेनुसार नगरसेवक हा शब्द वापरला जाऊ लागला.

* नागरिकांनी आपले नागरी हक्क अधिकार जपण्यासाठी जागे होणे आता  काळाची गरज  आहे *

नगरसेवक त्या त्या वॉर्डमधील ज्येष्ठ, अनुभवी, सुशिक्षित,शांतता प्रस्थापित करणारा, आपसात कुठली ही तेढ निर्माण होऊ नये म्हणून काळजी घेणारा, आणि साधारणपणे नागरिकांशी सुख-दु:खाशी एकरूप आणि समरस होणारा, सर्वांच्या सुख दुःखात सामील  होणारा, माणुसकी आणि माणसं जपणारा  असे लोकप्रतिनिधी निवडला जात असे. ठराविक मर्यादा मध्ये समाजकारण आणि राजकारणात त्याला विशेष असे महत्वही होते. पण आताची परिस्थिती फार वेगळी आहे त्यामुळे नागरिकांनी आपले नागरी हक्क अधिकार जपण्यासाठी जागे होणे आता  काळाची गरज  आहे

*नागरिकांना जर जाग आली नाही तर येणाऱ्या पिढीचे भवितव्य धोक्यात*

गेल्या  १० ते १२ वर्षांमध्ये "नगरसेवक' या पदाची प्रतिष्ठा संपली आहे की काय ? असा प्रश्न आता उद्भवला आहे ? नगरसेवक हा शब्द वाईट अर्थाने म्हटला जातोय की काय? अशी शंका यावी इतके राजकीय वातावरण गढूळ झालेले आहे. ज्या लोकांचे, नागरिकांचे, प्रभागातील रहिवाशांचे आपण लोकप्रतिनिधीत्व करतो, त्या लोकप्रतिनिधीची म्हणजेच नगरसेवकांची नेमकी कर्तव्ये काय ? आणि नेमके कोणते कार्य नगरसेवकाकडून अपेक्षित आहे ?नागरिकांनी हा विषय आता गांभींरियानी घेऊन महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी  होण्याची नितांत गरजेचे आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी, आजी, माजी ,इच्छुक  नगरसेवकांनी आणि नेतेमंडळींनी याचा गांभीर्याने विचार करून त्या सर्व बाबींची गांभीर्याने दखलही घेऊनच उमेदवार निवडीला प्राधान्य दिले जावे, अशी सर्वसामान्य नागरिकांची  रास्त अपेक्षा आहे. 

समाजातील ज्येष्ठ आणि बुध्दिवादी म्हणवून घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी आज विचार करण्याची क्षमता बाळगली नाही तर येत्या काळात त्यांची विकासाची प्रक्रिया मंद होणार आहे, नगरसेवक निवडताना, जनतेच्या हिताचे रक्षण आणि भ्रष्टाचार मुक्त आचरण असले तरच आपण खरंच प्रभागात विविध प्रकारच्या अडचणी राजरोसपणे  दूर करण्याचे मार्ग मोकळे करणारे ठरू शकेल. त्याच प्रमाणे नगरपालिकेची सत्ता ज्या नेतेमंडळींकडे आहे, त्या नेतेमंडळींनी अतिशय गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे. आपल्या शहराच्या भविष्यासाठी भावी पिढीच्या हितासाठी दूरदृष्टी ठेवून काही धोरणात्मक निर्णय  पक्ष श्रेष्ठींना  घ्यावे लागतील. कर्मश;

 प्रेस मीडिया लाईव्ह

सह संपादक अन्वरअली शेख

Post a Comment

Previous Post Next Post