सामाजिक संदेश देणारे "हवीशी वाटे" अल्बम गीत प्रेक्षकांच्या भेटीस

 अल्बम गीत क्वीन अभिनेत्री शुभांगी गायकवाड यांची माहिती..


प्रेस मीडिया लाईव्ह :

आधुनिकता व चंगळवादी संस्कृतीमुळे तरुणाई भरकटून सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे.अशा परिस्थितीत वेळीच योग्य मार्गदर्शन व चांगली सोबत मिळाली की जीवनाला मोठा अर्थ प्राप्त होतो ,असे सामाजिक संदेश देणारे एस.बी.प्राॅडक्शन निर्मित व सप्तसूर म्युझिक प्रस्तुत हवीशी वाटे अल्बम गीत प्रेक्षकांच्या भेटीस आल्याची माहिती कोल्हापूरची अल्बम गीत क्वीन शुभांगी गायकवाड यांनी आज इचलकरंजी येथे पञकार बैठकीत बोलताना दिली.

कोल्हापूरची अल्बम गीत क्वीन अशी कलाक्षेत्रात ओळख असलेल्या अभिनेत्री शुभांगी गायकवाड यांचे अनेक अल्बम गीत प्रदर्शित होवून ते प्रेक्षकांच्या पसंदीस उतरले आहेत.त्यांचाच अभिनय असलेला एसडी प्राॅडक्शन एस.बी.प्राॅडक्शन निर्मित व साईनाथ राजाध्यक्ष यांचे सप्तसूर म्युझिक प्रस्तुत हवीशी वाटे अल्बम गीत प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.याबाबत सविस्तर माहिती देताना अभिनेत्री शुभांगी गायकवाड यांनी हवीशी वाटे या अल्बम गीताला सामाजिक संदेशाची पार्श्वभूमीवर असल्याचे सांगितले.आधुनिकता व चंगळवादी संस्कृतीमुळे तरुणाई भरकटून सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे.अशा परिस्थितीत वेळीच योग्य मार्गदर्शन व चांगली सोबत मिळाली की जीवनाला मोठा अर्थ प्राप्त होतो ,असा अलवार प्रेमभावनेचा आविष्कार घडवत सामाजिक संदेश देणारे हे गीत नक्कीच प्रेक्षकांच्या पसंदीस उतरेल ,असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.तसेच या गीतामध्ये अभिनेते विशाल फाले मुख्य भुमिकेत असून गीतातील कथाही तेवढीच दमदार दाखवली असल्याचे सांगितलेे.

या श्रवणीय गीताचे दिदर्शन सचिन कांबळे यांनी केले असून गायिका सोनाली सोनावणे ,गायक केवल वलंज व गीतकार राहुल काळे ,संगीतकार विज़य भारे यांचेही कला कौशल्य कौतुकास्पद ठरल्याचे सांगितले.तरी प्रेक्षकांनी नव्याने प्रदर्शित झालेले हवीशी वाटे अल्बम गीत प्रेक्षकांनी पाहून निखळ मनोरंजनाचा आस्वाद घ्यावा , असे आवाहन मनसे चित्रपट सेना उपजिल्हा संघटक सुशील बनसोडे यांनी देखील पञकार बैठकीत बोलताना केले.

यावेळी मनसे शहराध्यक्ष प्रताप पाटील , मनसे महिला जिल्हाध्यक्षा सिंधुताई शिंदे ,मराठी कामगार सेनेचे महेश शेंडे ,मनसे वाहतूक सेनेचे अनिल झाडबुके आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post