पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोहगाव विमानतळावर स्वागतप्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे,दि.14: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान महोदयांचे स्वागत केले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पंतप्रधान महोदयांचे स्वागत केले.

यावेळी खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सर्वश्री सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, चंद्रकांत पाटील, लेफ्टनंट जनरल जे.एस.नैन,पोलिस महासंचालक रजनीश सेठ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, वायुसेनेच्या पुणे विभागाचे प्रमुख एच. असुदानी यांनीही पंतप्रधान महोदय यांचे स्वागत केले.

Maharashtra DGIPR

Post a Comment

Previous Post Next Post