जगत गुरू संत तुकाराम महाराज यांच्या देहू नगरीत आज पंतप्रधान, कसा असेल कार्यक्रम...प्रेस मीडिया लाईव्ह

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी;   पठाण एम एस

पुणे दि.१३ देहूगाव : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिर आणि संत तुकाराम महाराज मूर्तीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १४ जूनला  श्री संत नगरी देहूत येणार आहेत.

 जगदगुरु संत तुकाराम महाराज मंदिर परिसरात संस्थान आणि प्रशासनाकडून साफ-सफाईची कामे   आणि स्वागताची जय्यत तयारी केली आहे. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंद्रायणीचे आणि भामचंद्र डोंगराचे दर्शनही घेणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते जगत गुरू तुकाराम महाराजांच्या मूर्तीला अभिषेकही करण्यात येणार आहे.  पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी एक दिवस मंदिर भाविकांसाठी बंद असेल.

पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी देहुत भाजपच्या दिग्गज नेत्यांकडून पाहणी सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, हर्षवर्धन पाटील हे सातत्याने देहूत तयारीचा आढावा घेत होते . अंदाजे 40 ते 50 हजार वारकरी या कार्यक्रमासाठी येतील, असा अंदाज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वर्तवला आहे.

 देहू परिसरात पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी एसपीजी फोर्सच्या नियमानुसार विशेष सुरक्षा नियम लागू करण्यात आली आहे. या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या रस्त्याने जाणार-येणार आहेत, ते मार्ग व रहदारीचे रस्ते वाहतुकीसाठी बंद केले जाणार आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

   *जगत गुरू संत तुकाराम महाराजांच्या देहूत आज देशाचे पंतप्रधान कसा असेल नियोजन*

मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देहूत आगमन होईल.

त्यानंतर श्री संत तुकाराम महाराज मंदिराबाहेर वारकऱ्यांकडून स्वाग

मंदिरात आगमन, विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन, ध्वजपूजन, श्रीराम दर्शन, महादेव दर्शन,

पश्चिम दिशेच्या पान दरवाजातून इंद्रायणी नदीसह भंडारा, घोरवडी व भामचंद्र डोंगराचे दर्शन,

शिळा मंदिरात श्री संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीला अभिषेक व पूजा,

मंदिर कोनशिला अनावरण, अभंग गाथा दर्शन विश्वस्त समितीकडून सत्कार.

सभास्थळाकडे मार्गस्थ, सभास्थळी व्यासपीठावर आगमन, स्वागत

सत्कार, मंदिराचे लोकार्पण (बटन दाबून), प्रमुख पाहुण्यांचे भाषण,

पंतप्रधानांचे भाषण, समारोप


प्रेस मीडिया लाईव्ह

सह संपादक अन्वरअली

Post a Comment

Previous Post Next Post