उर्दू शाळेला शनिवार ऐवजी शुक्रवारी अर्धा दिवसाची सुट्टी देण्याचा 2017 चा *जी आर* असताना पुणे मनपा याला लागु करत नव्हते

 गेल्या 5 वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते एजाज भाई खान व त्यांची टीम सतत पाठपुरावा करत होती.

पत्रकार मजहर खान यांचा सत्कार करण्यात आला.

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : उर्दू शाळेला शनिवार ऐवजी शुक्रवारी अर्धा दिवसाची सुट्टी देण्याचा 2017 चा *जी आर* असुन ही पुणे मनपा याला लागु करत नव्हते हे कायदेशिरपणे लागू व्हावे म्हणून गेल्या 5 वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते एजाज भाई खान  व त्यांची टीम सतत पाठपुरावा करत होती.

या कामासाठी त्यांना स्थानिक नगरसेवक, पत्रकार ,वकील, स्थानिक नागरिक यांनी मदत केली. पण सुरुवात व शेवटपर्यंत लढले ते एजाज भाई .या कामासाठी तर मुस्लिम समाजाने एजाज भाई खान चे आभार मानले , सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा.नगरसेविका फरजानाआपा अय्युब शेख, मुस्लिम बँक डायरेक्टर समीरभाई शेख,पत्रकार मजहर खान, सामाजिक कार्यकर्ते एजाज भाई खान,मा.नगरसेवक व  मुस्लिम बँक डायरेक्टर अय्युब शेख,ओबीसी चे इकबाल अन्सारी,मा.नगरसेवक अविनाश साळवे,मा.नगरसेवक संजय भोसले, आर  पी आय चे शैलेशभाऊ,एड वाजेद खान, मा.नगरसेवक हनिफ शेख,व इतर मान्यवर उपस्थित होते.

पत्रकार मजहर खान यांचा या वेळी विशेष सत्कार करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post