सध्याची वाहतूक कोंडी पाहता वाहतूक नियंत्रण यंत्रणेला प्रशिक्षणाची गरज आहे का ?



प्रेस मीडिया लाईव्ह

जिलानी उर्फ मुन्ना शेख

पुणे शहर आणि उपनगरातील शहरीकरण आणि पिंपरी-चिंचवड शहर तसेच प्राधिकरण ,औद्योगिकरण, आयटी पार्क परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी एक गंभीर समस्या  निर्माण झालेली दिसून येत आणि दिवसेंदिवस  वाहतूक कोंडी अधिक जटिल रूप धारण करत असताना चे चित्र  आज संपूर्ण शहरी भागात निर्माण झाला आहे.त्यासाठी प्रशासनाला आणि वाहतूक यंत्रणेला मिळून उपाय योजना अंमलात आणण्यासाठी पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली पाहिजे.

*अनेकदा घाई गडबडीत वाहन चालवताना, एखाद्या ठिकाणी लवकर पोहोचायचं असतं तेव्हा वाहन चालकांकडून चुका होता. त्यातही प्रामुख्याने दुचाकी चालक जास्त चुका करतात. या चुका कधी लहान तर कधी मोठ्या देखील असतात. जसे की कार चालवताना चालक किंवा त्याच्या शेजारी बसलेला प्रवासी सीट बेल्ट लावायला विसरतो. दुचाकी चालवताना हेल्मेट घालायला विसरतो, वाहनाची लाईट किंवा हॉर्न सदोष असली तरी तो चालकाचा किंवा ड्रायव्हिंगचा दोष मानला जातो. अशा वेळी अनेकदा ट्राफिक हवालदार गाडी अडवतात, चालकाने जी काही चूक केली असेल त्याबद्दल चालान (दंड) भरायला लावतात. नियमांनुसार त्यांची कारवाई योग्य असते. अनेकदा पोलिसांनी चालान भरायला लावू नये म्हणून विनंती करतात तर काही वेळा वाहतूक पोलिसाशी हुज्जत देखील घालतात. याच दरम्यान, अनेकदा ट्राफिक हवालदार गाडीची चावी काढून घेतात. मात्र ही बाब वाहतूक विभागाच्या नियमांच्या विरुद्ध आहे. तुमच्या गाडीची चावी काढून घेण्याचा, तुम्हाला अटक करण्याचा किंवा वाहन जप्त करण्याचा अधिकारही हवालदाराला नसतो. मात्र, आपल्यापैकी अनेकांना याची माहिती नसते. आपली चूक आहे म्हटल्यावर चालक पोलिसांना घाबरतात. असे प्रसंग अनेकदा येऊ शकतात. मात्र अशा वेळी आपले म्हणजे नागरिकांचे हक्क देखील आपल्याला माहिती असायला हवेत. आज आम्ही याबद्दलच तुम्हाला माहिती देणार आहोत.

*मोटार वाहन कायद्या  बाबत माहिती लोकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता*

मोटर वाहन कायद्यांतर्गत जसे वाहन चालकांसाठी नियम आहेत. तसेच नागरिक म्हणून आपले काही अधिकारही आहेत. भारतीय मोटार वाहन कायदा १९३२ अंतर्गत, केवळ एएसआय (असिस्टंट सब इन्स्पेक्टर) लेव्हलचा अधिकारीच रहदारीच्या उल्लंघनासाठी तुमचे चालान कापू शकतो. एएसआय, एसआय, इन्स्पेक्टर यांना स्पॉट फाइन करण्याचे अधिकार आहेत. त्यांना मदत करण्यासाठी वाहतूक हवालदारच असतात. कुणाच्याही गाडीच्या चाव्या काढण्याचा अधिकार त्यांना नाही. अनेकदा हवालदार गाडीच्या टायरमधली हवा काढून टाकतात. मात्र ही बाब गंभीर आहे. ट्राफिक पोलीस तुमच्या गाडीच्या टायरची हवा देखील काढू शकत नाहीत. ते तुमच्याशी चुकीच्या पद्धतीने बोलू शकत नाहीत किंवा वाईट वागू शकत नाहीत. ट्राफिक पोलीस तुम्हाला विनाकारण त्रास देत असतील तर तुम्ही त्यांच्यावरही कारवाई करू शकता.

​ट्राफिक हेड कॉन्स्टेबल केवळ १०० रुपयांचा दंड आकारू शकतोवाहतूक पोलिसांचा हेड कॉन्स्टेबल तुमच्याकडून केवळ १०० रुपये इतकाच दंड आकारू शकतात. यापेक्षा जास्त दंड केवळ वाहतूक अधिकारी (ट्राफिक ऑफिसर) म्हणजेच एएसआय किंवा एसआय आकारू शकतात. म्हणजेच ते १०० रुपयांपेक्षा जास्त चालान लावू शकतात. ट्राफिक कॉन्स्टेबल जर तुमच्या गाडीची चावी काढून घेत असेल तर तुम्ही त्या घटनेचा व्हिडीओ बनवू शकता. हा व्हिडीओ तुम्ही त्या भागातील पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्याला दाखवून तक्रार दाखल करू शकता. त्यामुळे अशा वेळी न घाबरता परिस्थिती शांतपणे हाताळायला हवी.

नागरिकांनी देखील पोलिस प्रशासनाला कारवाईदरम्यान सहकार्य करण्याची भावना ठेवणे गरजेचे आहे

वाहन चालवताना तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स (चालक परवाना), प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची मूळ प्रत (पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेटची ओरिजिनल कॉपी) असायला हवी. तसेच वाहन नोंदणी (रजिस्ट्रेशन) आणि इन्शुरन्सची फोटोकॉपी देखील चालते. समजा तुमच्याकडून एखादी चूक झाली, किंवा तुम्ही रहदारीचा एखादा नियम मोडलात आणि चालान भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतील तर अशा परिस्थितीत न्यायालय चालान जारी करते, मात्र तुम्हाला ते न्यायालयात जाऊन भरावं लागेल. या काळात वाहतूक पोलीस अधिकारी तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स सोबत ठेवू शकतात. ते तुम्हाला चालान भरल्यानंतर मिळेल.ट्राफिक पोलिसाने प्रवासादरम्यान तुमची गाडी अडवून गाडीची चावी काढून घेतली आणि तुम्ही त्याच्याविरोधात तक्रार केलीत तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते. भारतीय मोटार वाहन कायदा १९८८ मध्ये पोलीस कर्मचाऱ्याला वाहन तपासणीदरम्यान वाहनाची चावी काढण्याचा अधिकार देण्यात आलेला नाही. मात्र पोलीस कर्मचार्‍याने तपासणी करताना वाहन चालक/मालकाला चालक परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स दाखवायला सांगितलं तर तुम्हाला ते दाखवावं लागेल. तसेच वाहनाशी संबंधित कागदपत्रे दाखवावीत.मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ३, ४ अंतर्गत, सर्व चालकांकडे त्यांचा चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) असणे आवश्यक आहे. कलम १८३, १८४ आणि १८५ अंतर्गत वाहनाची वेगमर्यादा योग्य असणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही मद्यपान करून वाहन चालवू शकत नाही. जर तुम्ही या चुका केल्यात तर वर दिलेल्या कलमांतर्गत तुमच्याकडून एक हजार रुपयांपासून ते दोन हजार रुपयंपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळे वाहन चालवताना तुम्ही स्वतः कोणतीही चूक करू नका, केलीत तर वाहतूक अधिकाऱ्याकडे दंड भरा आणि त्याची पावती घ्या. त्याचबरोबर तुमची काही नसेल तर घाबरू नका.


प्रेस मीडिया लाईव्ह

सह संपादक अन्वरअली शेख

Post a Comment

Previous Post Next Post