किवळे मुकाई चौकात महापालिकेची अतिक्रमण विरोधी धडक कारवाई करण्यात आली

अतिक्रमण विरोधी पथक पोलिस फौफाट्यासह दाखल झाल्याने परिसरातील दुकानदारांचे धाबे दणाणले.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : एम एस पठाण

पिंपरी दी.६ किवळे या ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर स्मार्ट सिटी अंतर्गत मुकाई चौक ते भोंडवे चौक या भागात रावेत बिआरटी रोड च्या दोन्ही बाजूस असणाऱ्या अतिक्रमणावर कारवाईचा बडगा उचलला आहे.

महापालिका प्रशासनाने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरु केली आहे. अनधिकृत बांधकामे, पत्राशेड, टप-या काढण्यात येत आहेत. शहराच्या वेगवेगळ्या भागात दररोज कारवाई सुरु आहे. आज किवळे परिसरातील मुकाई चौक येथे धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे.

 महापालिका अतिक्रमण विरोधी पथक धडक कारवाई पथक यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील अतिक्रमणावर कारवाईची मोहीम चालू केलेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कारवाईचा काही दिवसा अगोदर या दुकानदारांना नोटीसही बजावण्यात आल्या होत्या असे समजले आहे . आज सोमवार आठवड्याचा पहिला दिवस कोरोणाच्यामहमारीतून सावरलेल्या दुकानदारांकडून ग्राहकांची लगबग आणि त्यातून कमाईची अपेक्षा असतानाच सकाळी साडे दहाच्या सुमारास अतिक्रमण विरोधी पथक पोलिस फौफाट्यासह दाखल झाल्याने परिसरातील दुकानदारांचे धाबे दणाणले,बागता बागत कारवाई सुरू झाली त्यावेळी दुकानातून समान बाहेर काढण्याचे कार्य झटापटीने दुकानदार करतानाचे चित्र मूकाई चौकातील परिसरात दिसून येत होते.प्रेस मीडिया लाईव्ह

सह संपादक अन्वरअली शेख

Post a Comment

Previous Post Next Post