एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री

मुबई | संख्याबळ असतानाही देवेंद्र फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली, फडणवीसांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले.


बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची भूमिका घेऊन 50 आमदारानी वेगळी भूमिका घेतली, त्यांना मी धन्यवाद देतो. त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याला तडा जाऊ देणार नाही. हे सरकार लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यास कटीबद्ध आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.आम्ही जो निर्णय घेतला आहे त्याबाबत मी आपल्याला बोललो आहे की, बाळासाहेबांचे हिदुत्व, त्यांची भूमिका आणि राज्यातील विकास या भूमिका घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत. आम्ही जवळपास 50 आमदार एकत्र आहोत. वैचारिक भूमिका, राज्याचा विकास आणि अडीच वर्षात जे काही घडलं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, असं ते म्हणालेत.

आपली जी नैसर्गिक युती होती, आपण एकत्र निवडणूक लढवली आणि महाविकास आघाडी स्थापन झाली. मतदारसंघातील प्रश्न आणि येत्या निवडणुकीतील अडचणी विचारात घेऊन निर्णय घेतला आहे. कुणाला काही मंत्रिपद पाहिजे म्हणून हा निर्णय घेतलेला नाही, असं ते म्हणालेत.

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याला एक पर्यायी सरकार देण्याची गरज होती, ती आम्ही देतोय. एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post