जागतिक पुस्तक दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनचा कार्यक्रम संपन्न

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित "कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड्., पेठ वडगाव येथे बुधवार, दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी जागतिक पुस्तक दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. निर्मळे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

 या प्रदर्शनामध्ये दुर्मिळ ग्रंथ ,संदर्भ ग्रंथ ,आत्मचरित्र तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या डिक्शनरी त्याचप्रमाणे जीवन चरित्र ठेवण्यात आली होती. महाविद्यालयातील छात्राध्यापकांचा या ग्रंथ प्रदर्शनासाठी उस्फुर्त सहभाग मिळाला. ग्रंथपाल चौगुले एस. एस. यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, त्यानी वाचाल तर वाचाल या वाक्याचा संदर्भ देत बोलल्या पुस्तक हे एक असे साधन आहे की, जे आपल्याला कोणत्याही परिस्थितीत वाचवू शकते., त्याचबरोबर प्रथम वर्षाचे छात्राध्यापक अक्षय शिपुरे व वर्षा कोळी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. 

महाविद्यालयाच्या प्राचार्या निर्मळ मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्या बोलल्या, जर आपण दररोज एखाद्या पुस्तकाचे एक पान जरी वाचले, तरी आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे सार्थक ठरू शकते. शेवटी कार्यक्रमाचे आभार प्राध्यापिका शिरतोडे व्ही.एल. यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी, प्रथम वर्षाचे छात्राध्यापक  उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post