चेंबूर कर्नाटक हायस्कूलमध्ये शिक्षक निरीक्षक श्रीमती.उर्मिला मँडम यांच्या हस्ते पाठ्यपुस्तके देऊन विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागतप्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई :  चेंबूर येथील  चेंबूर कर्नाटका हायस्कूल मध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले .सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य मा. श्रीमती उर्मिला पारधे( शिक्षक निरीक्षक मुंबई) यांच्या हस्ते देऊन स्वागत करण्यात आले.

 यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. गीतांजली सलियल. उपमुख्याध्यापिका सौ. अनिता शेट्टी पर्यवेक्षिका सौ. निशा विश्वकर्मा, शिक्षण विभागाचे श्री. पगारे सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत फुलांचा वर्षाव करून शाळेचे बँड पथक वाजून उत्साहात स्वागत करण्यात आले.  यावेळी शिक्षक निरीक्षक र्श्रीमती उर्मिला पारधे मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांना  नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. गीतांजली सालियन यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन नवीन पाठ्यपुस्तक व शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत केले. सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चरणजीत कोर् मॅडम यांनी केले .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.अंकुश जाधव ,श्री.राजेंद्र सिंग श्री. श्रीराम महाजन श्री दादाभाऊ जोशी.सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप मेहनत घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post