फुरसुंगी येथे आम आदमी पार्टी पुणे शहराच्या १३ व्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न.


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : मंगळवारी दिनांक १४ जून २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता आम आदमी पार्टी (आप) चे महाराष्ट्र राज्य संघटक व पुणे कार्याध्यक्ष श्री विजय कुंभार यांच्या शुभहस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन फुरसुंगी येथील गंगानगर, हरपळे पाटील विहार येथे संपन्न झाले. 

सदर कार्यक्रमाचे आयोजन हे आप चे संभाव्य उमेदवार सचिन कोतवाल, अशोक हरपळे आणि अस्मिता मांढरे यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे प्रभाग समन्वयक विद्यानंद नायक यांनी केले. 

पुणे शहरातील तेराव्या (१३) कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात मनोगतात व्यक्त करताना *विजय कुंभार जी म्हणाले कि, "येणाऱ्या नवीन पिढीसाठी जर चांगलं सामाजिक वातावरण निर्माण करावयाचं असेल तर आगामी पुणे म.न.पा. निवडणूकीत फुरसुंगीतील मतदारांनी आप च्या उमेदवारांना निवडावं. इतर पक्षांतील भष्ट नेत्यांमुळे आजपर्यंत हडपसर-फुरसुंगी भाग हा विकासापासून वंचित राहिला. या भष्टाचारवर आता आप चा झाडू फिरवणे अत्यंत गरजेचं झालं आहे. तसं केल्यास पुण्यात हमखास परिवर्तन घडेल".

राज्य प्रवक्ते व पुणे संघटक डॉ. अभिजीत मोरे यांनी आम आदमी पक्षाची भूमिका ही कशी लोकहिताची व सर्वसमावेशक आहे यावर प्रकाश टाकत दिल्लीतील आप सरकारच्या उल्लेखनीय कामाबद्दल सविस्तर माहिती दिली. 

पुण्यात सर्वत्र आम आदमी पक्षाने प्रचंड वेग कसा घेतला आहे याची एक झलक कालच्या पक्ष प्रवेशात दिसून आली. फुरसुंगी प्रभागातून संभाव्य उमेदवार म्हणून पत्रकार यशवंत बनसोडे आणि अस्मिता मांढरे यांनी त्यांच्या समस्त मित्र परिवार समेत पक्षात प्रवेश केला. 

प्रभाग ४५ फुरसुंगीतील ह्या १३ व्या कार्यालयाचे उद्घाटनाच्या कार्यक्रमास अशोक हरपळे, सचिन कोतवाल, यशवंत बनसोडे, अस्मिता मांढरे, विजय कुंभार, डाॅ. अभिजीत मोरे, ललिताताई गायकवाड, किशोर मुजुमदार (काका), घनशाम मारणे, प्रभाकर भोसले, अन्वर (बाबा) शेख, मनोज चोरडिया, फेबियन आण्णा सॅमसन, रामभाऊ इंगळे व इतर आप कार्यकर्ते आणि हडपसर क्षेत्रातील स्थानिक नागरिक उपस्थितीत होते. Post a Comment

Previous Post Next Post