इचलकरंजी : ज्येष्ठ नेते व समाजसेवक श्री. धोंडीलालजी शिरगांवे

   यांचा प्रेस मीडिया लाईव्ह तर्फे सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मनु फरास :

इचलकरंजी : येथील ज्येष्ठ नेते व  सर्वसामान्यांचे  आधारस्तंभ  म्हणून ओळखले जाणारे  मा. श्री. धोंडीलालजी शिरगांवे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन पुणे येथील प्रेस मीडिया लाईव्ह तर्फे त्यांचा आज सत्कार  प्रेस मीडिया लाईव्ह चे कार्यकारी संपादक , लियाकत सर्जेखान व कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी मनुभाई फरास यांचे हस्ते सन्मानपत्र देऊन  गौरव करण्यात आला.  प्रेस मीडिया लाईव्ह सोबत राहू ..श्री. धोंडीलालजी शिरगांवे  

आपल्या सत्कार प्रसंगी श्री शिरगांवे साहेब यांनी प्रेस मीडिया लाईव्हचे संपादक मेहबुब  सर्जेखान यांचे आभार मानून या पुढे  आम्ही सर्व  प्रेस मीडिया लाईव्ह सोबत राहू असे त्यांनी सांगितले . प्रेस मीडिया लाईव्ह तर्फे मला मिळालेला सन्मान हा माझा नसून मी केलेल्या चांगल्या कार्याचा आहे तसेच माझ्यासाठी हा सन्मान  फार अनमोल व महत्वाचा आहे असे ही त्यांनी या वेळी आवर्जून  सांगीतले.

या समारंभास अन्सारी सर , ज्येष्ठ नेते अहमद मुजावर , समीर शिरगांवे ,  रियाज जमादार , जनता नागरी सहकारी पत संस्थांचे अध्यक्ष श्री मुसा ख लीफा , महमद ढालाईत , रशीद मोमीन , मिरासाहेब समडोळे , महावीर काडाप्पा  , सदस्य , सर्व स्टाफ उपस्थित होत.

Post a Comment

Previous Post Next Post