गुलाब फूल, चॉकलेट देऊन विद्यार्थी -विद्यार्थिनींचे स्वागत


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल व आबेदा इनामदार ज्युनियर कॉलेज फाॅर गर्ल्स ,एम.सी.ई.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनियर कॉलेज,अँग्लो उर्दू बॉईज हायस्कुल मध्ये  शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे   स्वागत  उत्साहात करण्यात आले.या आनंदी प्रसंगी  गुलाब फुल व चॉकलेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.तत्पूर्वी  विद्यार्थी व पालकांचे उद्बोधन करण्यात आले.कोविड संबधित घ्यावयाची काळजी ,शैक्षणिक तयारी व विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये भाग घेण्या बाबत चर्चा करण्यात आली.

  

अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल व आबेदा इनामदार ज्युनियर कॉलेज फाॅर गर्ल्समध्ये  प्राचार्य गफार.ल.सय्यद, उपमुख्यध्यापिका शबनम खान, तस्नीम शेरकर,पर्यवेक्षिका दिलशाद शेख,नफीस शेख तसेच संस्थेचे अध्यक्ष डाॅ.पी.ए. इनामदार यांनी विद्यार्थ्याचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या.अँग्लो उर्दू बॉईज हायस्कुल मध्ये मुख्याध्यापक परवीन शेख यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.एम.सी.ई.एस इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये मुख्याध्यापक शिरीन खान, पर्यवेक्षिका शमा सय्यद, बिबि तस्नीम चिनिवार, संस्थेचे सहायक सचिव कदीर कुरेशी  यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. 





Post a Comment

Previous Post Next Post