जिल्हा प्रशासनाच्यावतीने करिअर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा

 हर, नजिकच्या भागातील विद्यार्थांनी लाभ घ्यावा  - जिल्हाधिकारी राहुल रेखावार

प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर : (जिमाका) : जिल्हा प्रशासानाच्यावतीने जिल्ह्यातील 10 वी 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअर आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे. 

 जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दि. 18 जून 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 यावेळेत स्व. यशवंतराव चव्हाण सभागृह, राजाराम कॉलेज येथे करिअर आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत सध्याच्या स्पर्धेच्या युगात करिअर कसे निवडावे, स्पर्धा परीक्षांना कसे सामोरे जावे, उपलब्ध संधी, प्रवेश प्रक्रिया आदी विषयांवर तज्ज्ञअ व्याख्याते ऋषिकेश हुंबे, (आय.आय.एम. अहमदाबाद) सीईओ, करिअर कॉर्नर, पुणे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कोल्हापूर शहर तसेच नजिकच्या भागातील विद्यार्थांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केले.


Post a Comment

Previous Post Next Post