राज ठाकरे यांच्या भाषणाची स्क्रिप्ट भाजपने लिहून दिलीय असे दिसतेय...काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलप्रेस मीडिया लाईव्ह :

 सांगली : महाराष्ट्र नवनीर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल  औरंगाबद येथे सभा पार पडली या सभेत राज ठाकरे यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास, शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे सुरू झालेला जातीय द्वेष, मशिदीवरील भोंगे आणि इतर काही मुद्द्यांवर भाष्य केले ,  राज ठाकरेंच्या भाषणानंतर राजकीय वर्तुळात आता पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर बोलत असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरेंच्या भाषणात मला काहीच दम वाटला नाही अशी टीका केली आहे.

यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधत असतांना जयंत पाटील म्हणाले की,'राज ठाकरे यांच्या भाषणात मला काहीच दम वाटला नाही. भाषणात नवीन काहीच मुद्दे नव्हते. मागील सभेत जे मुद्दे मांडले गेले तेच मुद्दे या भाषणात होते. त्या मुळे राज ठाकरे यांच्याकडे नवीन काही सांगण्यासारखे नाही असे दिसत आहे.’ तसेच राज ठाकरे यांच्या भाषणाची स्क्रिप्ट भाजपने लिहून दिलीय असे दिसतेय, अशी घणाघाती टीकाही पाटलांनी केली.

दरम्यान, 'मी गुढीपाडव्याला सभा घेतली. त्या सभेनंतर बरेच लोक बडबडायला लागली. त्यांना उत्तर देण्यासाठी एक उत्तर सभा ठाण्यामध्ये घेतली. खरं तर दोनच सभा मी घेतल्या, पण या दोन सभांवरती किती बोलत आहेत. जेव्हा ठाण्याची सभा झाली तेव्हा आमच्या एका मनसे सैनिकानी फोन केला आणि म्हणाला, सर आपण एक तरी संभाजीनगर मध्ये सभा घेऊ. पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, हा विषय फक्त संभाजीनगर मधील नाही. माझ्या यापुढच्या सर्व सभा मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात होणार आहेत. तसेच मी विदर्भातही जाणार आहे, आपल्या कोकणातही जाणार आहे. याबरोबरच उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातही जाणार आहे,’ अशी घोषणाही काल बोलत असतांना राज ठाकरेंनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post