मनसे प्रणित मराठी कामगार सेनेतर्फे नेञ - आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

 सामाजिक उपक्रमांनी कामगार दिन साजरा


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी येथे मनसे प्रणित मराठी कामगार सेनेच्या वतीने मोफत नेत्र व आरोग्य तपासणी ,आयजीएम रुग्णालयात रुग्णांना फळे वाटपअशा विविध सामाजिक उपक्रमांनी कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

मनसे प्रणित मराठी कामगार सेनेच्या वतीने मराठी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जातो.या संघटनेच्या वतीने रविवारी कामगार दिनानिमित्त शिवतीर्थ परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मनसे उपजिल्हा प्रमुख रवी गोंदकर ,शहर प्रमुख प्रताप पाटील यांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यानंतर नेञ व आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी भैरवनाथ रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने शिबिरार्थींची आरोग्य तपासणी करत आवश्यक औषधोपचार केले.यानंतरआयजीएम रुग्णालयात मान्यवरांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.या सामाजिक उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी कामगार सेना जिल्हाध्यक्ष मोहन मालवणकर, तालुका उपाध्यक्ष दीपक पोवार,  सहकार सेना जिल्हाध्यक्ष मनोहर जोशी, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष विनायक मुसळे, वाहतूक सेना तालुका अध्यक्ष,  रोजगार स्वयरोजगार सेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम, चंदुर शहर अध्यक्ष मनोज पाटील, शहर उपाध्यक्ष प्रमोद भाटले, शहर उपाध्यक्ष संग्राम पोरे,  , सहकार सेना शहर अध्यक्ष योगेश तिवारी, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष रोहित कोटकर, शहर सचिव रोहन ढेरे, गौतम टेके, बाळासाहेब राजमाने, महिला जिल्हाध्यक्षा सिंधूताई शिंदे, शहर अध्यक्षा स्मिता पोवार, उपतालुका अध्यक्षा राणी सुतार, मराठी कामगार सेनेच्या शाखा अध्यक्षा संगीता भंडारे,मराठी कामगार सेनेचे शाखा अध्यक्ष पोपट हत्तीकर, अमित पाल, मारुती जावळे, ऋषिकेश पाटील यांच्यासह मनसेचे पदाधिकारी , सदस्य उपस्थित होते.

या सामाजिक उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी कामगार सेनेचे तालुका अध्यक्ष महेश शेंडे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश दाभोळकर , तालुका उपाध्यक्ष राकेश कमलाकर, मराठी तालुका सचिव विशाल पाच्छापुरे,शहाजी घाडगे,  समिती अध्यक्ष नरेंद्र गोंदकर यांच्यासह सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post