प्लास्टिक कचऱ्यावर हुतामाकी कंपनीचा तोडगा, कंपनीच्या सिएसआर मधून रीसायक्लिंग प्लांटचे उद्घाटन

महिन्याला ६० टन प्लास्टिक कचऱ्याचा करणार पुनर्वापर , स्थानिक संस्थांची घेणार मदत.


प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :  सुनील पाटील

   जगाने आधुनिकतेचा मार्ग अवलंबला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस प्रगतीच्या दिशेने जगाची वाटचाल सुरू आहे. अशात नागरीकिकरण देखील झपाट्याने वाढते आहे. तेव्हा कचऱ्याची समस्या देखील त्यामुळे जगात उभी राहिली आहे. त्यात प्लास्टिक हा विघटन न होणारा घटक असल्याने ती एक मोठी समस्या म्हणून समोर आली आहे. रायगड जिल्ह्यात पसरलेला आणि ग्रामीण शहरी असा भौगोलिक परिसर असल्याने येथेही प्लास्टिक कचरा अनेक ठिकाणी दिसून येतो. त्यामुळे या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी हुतामाकी कंपनी सरसावली आहे. कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीमधून खोपोली रानसई येथे प्रायोगिक तत्त्वावर प्लांट सुरू करण्यात आला आहे. याचे उद्घाटन 2 मे रोजी करण्यात आले.



  रोजच्या वापरात प्लास्टिक हे असतेच कधी ते चिप्सचे पाकीट असो, साबणाचे कवर, कधी अजून कुठल्या रूपाने पण हे प्लास्टिक नंतर कचऱ्यात कुठेही टाकून दिले जाते. त्यामुळे जनावरांच्या पोटात, नदीत, समुद्रात हे प्लास्टिक जात असते. एकूण काय तर नंतर पर्यावरणाची हानी या प्लास्टिकमुळे होते. तेव्हा पॅकेजिंग, मध्ये काम करणाऱ्या हुतामाकी या कंपनीने या समस्येवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. प्लास्टिकचा पुनर्वापर केल्यास प्लास्टिक कचरा आपण संपवू शकतो अशी नवी संकल्पना कंपनीने जनसामान्यांच्या मनात रुजवायला सुरुवात केली आहे. त्यासाठी खोपोली येथे प्लास्टिक रिसायकल प्लांट चे नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे. जपानस्थित या कंपनीने प्लास्टिक कचरा मुक्तीचा संदेश घेऊन कामास सुरुवात केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर एका प्लांट चे उद्घाटन करण्यात आले असून त्यामध्ये महिन्याला ५५ ते ६० टन प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.प्लास्टिक कचरा मुक्तीचा संदेश घेऊन कंपनीने प्लांटसाठी फेब्रुवारी २०२१ मध्ये खोपोली रानसई येथे भूमिपूजन केले होते. मार्च २०२२ मध्ये पहिली ट्रायल घेण्यात आली तर पूर्णपणे प्लांट कार्यान्वित झाल्यानंतर आज त्याचे कंपनीचे अध्यक्ष मार्को बिल्टी, आदीच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्लास्टिक कचरा धुवून, साफ करून, त्यावर प्रक्रिया करून त्यातून वस्तू बनवल्या जातात, यापेक्षा मोठा प्लांट करण्याचा मानस असल्याचे यावेळी सस्थेचे सुनील भागवत यांनी सांगितले. याठिकाणी पाण्याचा पुनर्वापर केला जातो त्यासाठी फिल्टर व nbp प्लांट लावले  गेले असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक सामाजिक संस्था यांची मदत घेऊन प्लास्टिक कचरा संपवण्याचे उदिष्ट असल्याचे भागवत यांनी सांगतानाच नागरिकांनी घरीच कचरा वेगळा करावा जेणेकरून तो प्रक्रिया करायला सोपा पडेल तरच आपण कचऱ्याच्या समस्येवर कायस्वरूपी उपाययोजना करू शकू असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. यावेळी कंपनीचे अध्यक्ष मार्को हिल्टी, श्री. मुरली, श्री. शिवरामन, श्री. थॉमस, सुनील भागवत आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post