महाराष्ट्र कामगार सेनेतर्फे ज्येष्ठ कामगार पुरस्काराचे वितरण

सरकारी कामगार अधिकारी राहुल जगताप यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती.प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी येथे महाराष्ट्र कामगार सेना या संघटनेच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिन ,कामगार दिन व शिवजयंतीचे औचित्य साधून विविध क्षेञातील कामगारांना ज्येष्ठ कामगार पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.या पुरस्काराचे वितरण सरकारी कामगार अधिकारी राहुल जगताप यांच्या हस्ते व  दुकान निरीक्षक महेश हेंद्रे , चंदूर ग्रामपंचायत सदस्य फिरोज शेख ,संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

इचलकरंजी येथील महाराष्ट्र कामगार सेना या संघटनेच्या माध्यमातून यंञमाग , बांधकाम यासह विविध क्षेञातील कामगारांवरील अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन ,मोर्च अशा मार्गांचा अवलंब केला जातो.याशिवाय कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचाही सातत्याने प्रयत्न सुरु ठेवण्यात आला आहे.या संघटनेच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिन ,कामगार दिन व शिवजयंतीचे औचित्य साधून 

विविध क्षेञात कार्य केलेल्या राजेंद्र कांबळे ,तानाजी सोकाकणे , गजानन मेटे , मच्छिंद्र सुळ ,सुरेखा चव्हाण , शेवंता शिंदे ,दत्ता खाडे यांच्यासह अनेक कामगारांना ज्येष्ठ कामगार पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.या पुरस्काराचे वितरण सरकारी कामगार अधिकारी राहुल जगताप यांच्या हस्ते व  दुकान निरीक्षक महेश हेंद्रे ,चंदूर ग्रामपंचायत सदस्य फिरोज शेख ,संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.तत्पूर्वी , प्रमुख पाहुणे सरकारी कामगार अधिकारी राहुल जगताप व विविध मान्यवरांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांनी महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून कामगारांना न्याय हक्क मिळवून देवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कायम कार्यरत असल्याचे सांगितले.

यावेळी सरकारी कामगार अधिकारी राहुल जगताप यांनी महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून कामगारांच्या न्याय हक्कासाठी होत असलेल्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.या कार्यक्रमास महाराष्ट्र कामगार सेनेचे जिल्हा संघटक राहुल दवडते , शहर अध्यक्ष शिवाजी टोपकर ,इचलकरंजी शहर उपाध्यक्ष महेश डांगरे , अनिल आस्वले ,राजू पाटील ,विठ्ठल जगदाळे , अमित गुरव यांच्यासह पदाधिकारी , सदस्य व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post