नदी सुधार योजना विषयावरील चर्चासत्राला प्रतिसाद

 शहराला प्रदूषणामुळे नदीकडे पाठ फिरवावी लागू नये, नदी सुधार  हा पोरखेळ  होऊ नये : चर्चासत्रातील सूर


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्बन सेलच्या वतीने आयोजित नदी सुधार योजना विषयावरील चर्चासत्राला सोमवारी चांगला प्रतिसाद मिळाला. पालिकेचे अधिकारी, सल्लागार,पर्यावरणप्रेमी नागरिक, संस्थांनी या चर्चासत्रात मते मांडली. शहराला प्रदूषणामुळे नदीकडे पाठ फिरवावी लागू नये,नदी सुधार म्हणजे पोरखेळ होऊ नये , असा सूर चर्चासत्रात उमटला.

पुणे पालिके तर्फे  प्रकल्प अधीक्षक अभियंता  युवराज जगताप यांनी नदी सुधार योजनेचे सादरीकरण केले.  प्रकल्पाचे सल्लागार गणेश आहिरे ( अहमदाबाद ) , पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते सारंग यादवाडकर यांनी सादरीकरणे केली.

तज्ज्ञांची मते लक्षात घ्या : खा. वंदना चव्हाण

संयोजक खा. वंदना चव्हाण म्हणाल्या, ' पुण्याची नदी जीवित राहिली पाहिजे. प्रदूषित होता कामा नये.मल: निस्सारण योजना शंभर टक्के क्षमतेने चालू नाहीत. नागरिक म्हणून आपल्या पालिकेकडे अपेक्षा आहेत. नागरिक म्हणून आम्ही पालिकेला सहकार्य करायला तयार आहोत. स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञांची मते पालिकेने विचारात घेतले पाहिजे. लोकसहभाग आवश्यक आहे. स्वयंसेवी संस्था विरुद्ध पालिका असे चित्र उभे राहता कामा नये.

जायका योजनेतून पाणी स्वच्छ झाले पाहिजे. पण, धरणांच्या कडेच्या गावातून प्रदूषित पाणी मिसळले जात आहे. नदीकडे पाठ करावी लागता कामा नये. नदी सुधार योजनेनंतर पुराची स्थिती येता कामा नये.पूररेषा वाढलेली आहे, पण नकाशात ती रेषा आत आलेली दिसते.

नीलेश नवलखा यांना सूत्रसंचालन केले. नितीन कदम यांनी तुळशीची रोपे देऊन  स्वागत केले.गोपाळ तिवारी यांनी आभार मानले

सभागृहात प्रशांत जगताप,  राजलक्ष्मी भोसले, अभय छाजेड, उज्ज्वल केसकर,गोपाळ तिवारी, आमदार सुनील टिंगरे,दीपाली धुमाळ, नीता परदेशी, प्रशांत बधे,विवेक वेलणकर, नरेंद्र चुघ, शिवा मंत्री, डॉ. सतीश देसाई, डॉ. सुनील जगताप, अश्वीनी कदम, मीनल सरवदे , नंदा लोणकर, शिवसेनेचे डॉ. अमोल देवळेकर, मनसेचे योगेश खैरे, संतोष पाटील, पालिकेचे अधिकारी मंगेश दिघे   उपस्थित होते.


पुणे पालिकेचे प्रकल्प अधीक्षक अभियंता युवराज देशमुख म्हणाले,नदी सुधार योजना आणि जायकाचा नदी शुध्दीकरण प्रकल्प एकाच वेळी सुरू होत आहे.


नदीचे पाणी स्वच्छ करण्यासाठी भगीरथ प्रयत्न करावे लागणार आहेत. मलः निस्सारण प्रकल्प तपासावे लागणार आहेत. नदी सुधार योजनेत वेगवेगळे शास्त्रीय सर्वेक्षणे करताना नागरिकांची मतेही नोंदवली आहेत. या प्रकल्पाला पर्यावरण खात्याची परवानगी आहे.


पालिका स्वयंसेवी संस्थांना उत्तरदायी राहण्याचा प्रयत्न करीत आले आहे.


नदी सुधार प्रकल्प हा पुनरुज्जीवनाचा प्रकल्प : सल्लागार गणेश अहिरे

.......................

 नदी सुधार योजनेचे सल्लागार गणेश अहिरे    (अहमदाबाद )म्हणाले, ' शहरीकरणामुळे नदीवर परिणाम होत आहे. प्रदूषित नदी पूर्ववत करायला खूप प्रयत्न करावे लागणार आहे. शहरात ४४ किलोमीटरची नदी आहे.कचरा, प्रदूषित पाण्यापासून नदी वाचवण्याचा प्रयत्न  सुधार योजनेत केला जाणार आहे. पुराचा धोका कमी केला जाणार आहे. नागरिकांना फिरता येईल अशा जागा असणार आहेत.व्यावसायिक बांधकामे नसतील.

परिसंस्था, जैवविविधता  जपण्याचा प्रयत्न होणार आहे. हा सर्वंकष, परिपूर्ण असा नदी पुनरूज्जीवनाचा प्रकल्प ७६८ हेक्टरवर असणार आहे. जुने घाट, मंदिरे, वारसा स्थळे जपले जाणार आहेत

आपल्या अस्तित्वासाठी नदी जपा   : सारंग यादवाडकर

................

सारंग यादवाडकर म्हणाले, ' प्रकल्पाचे टेंडर निघाले आहे. तरी पालिकेचे अधिकारी सल्लागाराच्या खांद्यावर बंदूक ठेऊन काम करत आहे. पुणे हे पूरप्रवण शहर आहे. एक दोन तासात पुराचा फटका बसून जातो. प्रश्न आपल्या अस्तित्वाचा आहे. नदी प्रदूषणाचा दुष्परिणाम उजनीकाठच्या लोकांना, जनावरांना भोगावे लागत आहेत. नदी सुधार योजनेनंतरही प्रक्रिया न केलेले प्रदूषित पाणी नदीत मोठया प्रमाणात येणार आहेत. आताचे चार पूल पाडल्यावर दैनंदिन जीवन नीट चालेल का?७ पूल उंचावण्याचे तंत्र आपल्याकडे आहे का ?

ढगफूटी, अतीवृष्टीच्या वाढणाऱ्या पुराचा विचार या नदी सुधार प्रकल्पात करण्यात आलेला नाही. या प्रकल्पानंतरही पूर पातळी ५  ते १७ फुटाने वाढणार आहे. या प्रकल्प आरेखनात गंभीर चुका आहेत. कृत्रिम भरावामुळे वहनक्षमता धोक्यात येणार आहे, ज्याचे गंभीर परिणाम होणार आहेत.

हायड्रोलिक स्टडी चुकीचा आहे.पर्यावरण परवानगी मिळणे धक्कादायक आहे. नदीत काँक्रिटायझेशन व्हायला  नको.नद्या कशा  हव्यात, हे नागरिकांनी ठरवायला हवे, ते शास्त्रीय पध्दतीने व्हायला हवे.




Post a Comment

Previous Post Next Post